बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस

आज आहे प्रेमाचा दिवस
तिच्या शुभेच्याने होईल खास
हृदय नकळत फुलून येते
मिळता प्रेमिकेचा सहवास

रोजच प्रेमाचा दिवस असतो
मात्र आज त्याहूनही भारीच असतो
सर्व देतात शुभेच्या देतात प्रेम
कुणीही कटुता बाळगत नसतो

मनात इच्छा उफाळून येते
मिळण्यासाठी काही खास भेट
राहवत नाही प्रेमात पडल्यावर
तिला भेटावेसे वाटते जाऊन थेट

प्रेमाची अनुभूती मनास झाली
दुःख आपलेसे ही भावना समजली
डोळे आठवणीत ओले झालेले
त्यात प्रेमफुलें सुंदर उमलली

लिहत रहावे शब्द प्रेमाचे
वाचत रहावे भावना मनाची
हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने होते
जाणीव त्या अनमोल क्षणाची
_____________________________
©कवी धनराज भुमरे पाटील .
पाचोड ,औरंगाबाद.
मो- 7218613434
14/2/2018