शनिवार, २७ एप्रिल, २०१९

आकर्षण...

आकर्षण...

निसर्गाचा नियम आहे
स्वतःच्या अस्तित्वाला ठिकवून ठेवणे
इथे प्रत्येक जीव तेच करतोय...
मनुष्य थोडा वेगळा आहे त्याला चेतना आहे.
हेच त्याचे वेगळेपण पण निसर्गाने मनुष्याला त्या सत्यापासून नेहमीच दूर ठेवण्याचे काम केले, करते आणि करतच राहणार...
इथे दोनच रस्ते आहेत एक सत्याचा (आत्मा- त्यालाच मन म्हणूनही ओळखता येईल)  आणि अहंकाराचा .
अहंकार सावली सारखा आहे प्रकाश असेल तर तो पळ काढतो.
पण मानवाला त्याच मोहमायेच्या सावलीत रहायला इथे अनेक आमंत्रण दिले जातात,
जो प्रकाश हवा आहे त्याचीच भीती दाखवत सावलीत कसे राहता येईल याची अगदी सुंदर तजवीज केली आहे.
जेव्हा तारुण्य येते अन कामवासना जागृत होते आणि कामाला लागते.
आणि इथेच उलटा प्रवास सुरु होतो.
इज्जत पाहिजे जी की दुसऱ्याकडून मिळते तिला मिळवण्यासाठी किती धडपड असते प्रत्येकाची.
कशाला हवा मानसन्मान जो दुसऱ्यावर अवलंबून असणार आहे पण नाही इथेही कामवासनेने आपली जादू केलेली असते हेच आपले जीवन या देहाला सांभाळत राहायचे आणि निसर्गाचे चक्र चालवत राहायचे असे मन म्हणते पण हे मन मुळीच मन नसते. तो असतो अहंकार, तो स्वतःला मन म्हणून सतत दाखवत आला आहे. अहंकाराला मन समजून या कामवासनेत लिन होताना जराही फरक जाणवत नाही.
तरी खरे मन जो की आत्मा आहे तो एकच आहे तो नेहमीच सतर्क करतो पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने, चांगल्या कर्माचा अनादर केला की कामवासना पकडते.
क्षणिक सुखानंतर दुःखच वाट्याला येते.
सत्याचा मार्ग कधीही पकडता येतो पण त्याचीच तर भीती दाखवत आला आहे हा बाजार.
शारीरिक आकर्षणालाच प्रेम आहे असे अहंकार नेहमीच दाखवत आला आणि त्यालाच आपण अनुभवतोय..
जो सत्याचा दिशेने चालतो ना त्यालाच या प्रेमाची ओळख होते.
प्रेमाचा निरंतर वाहणारा झरा कुणाकडूनही मिळत नाही त्याची अनुभूती स्वतःच घ्यावी लागते ...
ती धार काही वेगळीच असते.
©धनु