काळजी पूर्वक पैसे खर्च करा
आज काल बचत म्हणजे सर्व ठिकाणी बचत करावीच लागणार आहे , काही ठिकाणी विनाकारण खर्च करून मोठेपणा दाखवतात ,
इथे फक्त पैसे उधळायला प्रश्न नाही इथे विषय आहे पैशामुळे होणारी लग्न कार्य, वाढदिवस , पार्टी , विनाकारण पेट्रोल जाळणे , आणि खास करून मोठे लोक पैशाची किंमत कमी करतात त्यांच्यासाठी काम महत्वाचे असते ,असले पाहिजे पण जिथे नुकसान फार होते पण दिसत नाही धावपळीत कुणाचे लक्ष जाते का प्रवास करताने किती खर्च ,
शिदोरी कुणी सोबत घेऊन जाताना दिसताच नाही बोटवर मोजण्या इतके असतील जे अजूनही पैशाची किंमत करतात ,
प्रत्येक गोष्टीत काटकसर करतात , काटकसर नेमकी काय तर जेवढे हवे आहे तेवढे घेतले पाहिजे आता प्रश्न नको की काय घेतात प्रत्येक गोष्टीत काटकसर पाहिजे , मग ज्ञान तर खुप घेतले पाहिजे पण असे ही नाही की खूप ज्ञान प्राप्त करण्यासाठी चुकीची माहिती हाती नको लागायला,
लग्नकार्यांत खूप खर्च करा पण सगळे नियोजन असले पाहिजे अन्न वाया जाऊ देने ही एक गंभीर बाब मनामध्ये ठेवून मोजकेच वाढले पाहिजे , आता काय आली स्वतः घायचे आणि जेवायचे बफे पद्दत , ज्यांना गरजच नाही ते जास्तीचे जेवण ताटात घेतात आणि नाही सरले की तसेच न फेकून दिले जाते पर्याय नसतो ना तेव्हा ,
वाढदिवसालाही पैसे उधळण पार्टी , जर घरगुती कार्यक्रम करतात घरी असल्याने काळजी घेतली जाते पण बाहेर पार्टी तरुणांची दारू पिणे हे हमखास ठरलेले असते , मग झिंगून ते काय किती उधळण करतात काय तर आनंद पहिला जातो ना हे थांबले पाहिजे.
खास करून छोट्या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाही खर्च करताने आपण किती काही गोष्टी ची विनाकारण संपवतो किंवा फेकून देतो ,
आपन चांगले दिसण्यासाठी भारी कपडे , महागडा फोन पाहिजे ,
पण नेहमी जुन्या गोष्टीचा वापर प्रयत्न, नेमकी काय करतो , ती वस्तू वापण्यायोग्य असली तेही अडगळीत टाकतो आणि नवीन वस्तू घेतो ,
नवीन वस्तू येते पैसे खर्च झाले ,
प्रत्येक वस्तूचा पुरेपुर फायदा घेतला पाहिजे ,
आता अजून एक प्रश्न निर्माण झाला कि जुन्या काही वस्तू ने काम लवकर काम होत नाही म्हणजे वेळ वाया जातो ,
आजकाल तरुणांना भारी स्मार्ट फोन पाहिजे गरज नसताने ज्यांना गरजेचे आहे त्यांना मिळत नाही हा नशिबाचा खेळ आहे , गरिबी आणि श्रीमंती यामध्ये खुप फरक जाणवतो पैशाने श्रीमती असलेली लोक पैसे वाचवत नाही याच बरोबर पैशामुळे खूप गोष्टीही ते सहज फेकून देतात ,
आजकाल पैशाला महत्व आहे कि गुणांना आहे हेच कळत नाही ?,
माणसात माणुसकीचे गुण कमी होत चालले आहे
ते वाचवणे फार गरजेचे आहे ,
आता बघा एखादा भूकेने व्याकुळ झाला आहे आणि बाहेर कुठे असताने जर हॉटेलात गेला तर जो फक्त जेवण करून भूक मिटवतो पण त्याच हॉटेल मध्ये काही फक्त हौस म्हणून येतात , इथे अन्न वाया जातेच पैसे वाया जातात , आणि वेळ ही वाया जाते ती कशी तर बघा भूक नसताने हॉटेल मध्ये जाणे वेळ वाया घालवने आहे ,
अजून खुप काही गोष्टी आहेत पण ,
तुमचा वेळ न घेता थांबतो तुम्ही समजदार आहात कारण मला असे वाटत आहे ज्या अर्थी वाचन करत आहात तुम्ही नक्की अशा गोष्टीचा विचार करतात , पण ज्यांच्या पर्यंत ही माहिती जाणे गरजेचे आहे तेच मात्र दुलक्ष करून , पैशे उधळतात त्या बरोबर इतर गोष्टी ही नकळत वाया जाणारच ,
तर काळजी पूर्वक पैसेखर्च करा ,
तरच तुम्ही खुश राहाल .
आणि चांगले गुण टिकवून ठेवा,
तरच पुढचा येणार काळ सुखाचा राहील
_____________________________
©कवी:-धनराज भुमरे पाटील
मु. पो. पाचोड , ता. पैठण ,जि. औरंगाबाद ,
ई-मेल :- dhanrajbhumarepatil@gmail.com
Mo:- 7218613434