रविवार, २३ डिसेंबर, २०१८

पोरी तुझा प्रेमी....

पोरी तुझा प्रेमी रोपटे
सरी झेलून त्यास पाहू दे
अन मुळाशी प्रेमाचा झरा
सदैव तुझा वाहत राहू दे

पोरी तुझा प्रेमी लाजरा
तुझ्या हाती त्याचा कासरा
सतावू नकोस कधी त्या
अल्लड बिचाऱ्या वासरा

पोरी तुझा प्रेमी हळवा
बांधलाय नात्यात घट्ट
मिळावा तोच मजला
असा नकोस करू हट्ट

पोरी तुझा प्रेमी भित्रा
जपतो दोघांच्या नावाला
समजतंय प्रेम तुझं पण
काय सांगेल तो गावाला

©धनराज भुमरे पाटील
२४/१२/२०१८

बघत वाट सजनाची

बघत वाट सजनाची
माळली फुले कोरी
गारवा अंगचटीला येतो
बघताच पाठ गोरी

तुझीच रे मी सजनी
तुझ्याचसाठी फुलने
आतुरता भेटीची बघ
तुझ्याचसाठी हे  झुरने 

©धनराज भुमरे

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

तू चिमनी शहरातली

तू चिमणी शहरातली
मी चिमणा गावातला
अंतर वाटेना काही तरी
फरक कळतो नावातला

ये एकदा शांत गावाकडे
मनसोक्त गाऊ गाणे
गोंधळात शहराच्या प्रिये
कसे ऐकू येतील तराने

©धनराज भुमरे

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

निशब्द भावना समजून घे.( तिच्या मनातल्या भावना समजल्यानंतर)

गुंतागुंत जीवाची ही झाली अशी
हृदय अन जीवाची भेट झाली अशी

फुले उमलले डोळ्यात असे सजले
डोळ्यातील अश्रूही माझ्यावर हसले

बंधने तुझी अन माझी हिराच जणू
विस्फोट विक्राळ घडवतो छोटासा अणू

नजरेतले प्रेम समजले मला आज
डोळ्यात अश्रूंचा चढलाच साज

सर्व कोडे सुटले आता जरी
मोकळा श्वास नाही भेटला आता तरी

संकटे येणार नवीन दोघांच्या समोर
करावे लागेल कधी हृदय खु कठोर

साथ दोघांची कायम पुढे असेल का
पूर्वीप्रमाणे दुःखात हृदय असेल का

प्रेम जीवापाड करतोय सांगू कसे
निःशब्द भावना तूच समजून घे हवे तसे...

©धनराज भुमरे पाटील....

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

बाप माझा छत्रपती

बाप माझा छत्रपती
मातीसाठी तो झुंजला
राजा शिव छत्रपती
नाद सह्याद्री गुंजला

मनगट जोर धरी
नाम घेता तुझे देवा
विचारांचा अनमोल
दिला आम्हा असा ठेवा

भाव भक्तीचा सागर
हाती तेज तलवार
शौर्यवंत महाराजा
किर्ती रे अपरंपार

चंद्रा सुर्यासम देवा
तेज तुझं बहुमान
पाने फुले आसमंत
पक्षी गाती गुणगान

©धनराज भुमरे पाटील
१६/१२/२०१८

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

बाप शिव छत्रपती

जगी असा एकच तो
माझा राजा पराक्रमी
असा लढला शत्रूंशी
मुक्त केली मायभूमी

युक्ती लढण्याची खास
सगळेच तोडी पाश
रयतेचा पाठीराखा
करी शत्रूंचा तो नाश

थोर ती माता जिजाऊ
दिले संस्कार एकीचे
आशीर्वाद तो जमले
वीर मावळे नेकीचे

राजा सर्वाचा कैवारी
असे गीत गाते माती
आम्ही लेकरे त्याचीच
बाप शिव छत्रपती

©धनराज भुमरे पाटील
१५/१२/२०१८

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

पाऊलखुणा

मनातलं सांगावे कुणा कळेचना
जातीचा हा प्रश्न अवघडच जरा
अहो सोडवल्या जाईना म्हणून 
आता न समजून घेतलेलाच बरा

देण्यास उदाहरण एकतेचे तरी
अनेक रंगी मणी जोडावे लागेल
सुखावतील सर्व यासाठी इथे 
प्रत्येकाचे गुणगान गावे लागेल

समजावतो मनाला बस इतकेच
निसर्गासारखा माणूस असावा
कार्य आपले असे करत रहावे
परकेपणाचा भाव मनी नसावा

मिटवून पाऊलखुणा माझ्या या
पाठलाग करत इथपर्यंत यावे
मिटवत त्यांच्याही पाऊलखुणा
अन त्यांनीही माघे न फिरावे

©धनराज भुमरे पाटील
१४/१२/२०१८