गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

प्रेम मरत नाही

प्रेम  मरत नाही
______________________________
फिरतात सारे एकही कुणा गठत नाही
चांगली अशी प्रेयसी त्यांना पटत नाही

दूर शहरातून कोणते वारे गावी आले
संस्कृती की आनंद हेच कळत नाही

प्रेम करतात खोटे काही दिवस आता
काहींचे पावले पुन्हा कधी वळत नाही

अबोल असतात काहींच्या भावना
मनात वादळे तरी सैरभैर पळत नाही

एकतर्फी निस्वार्थ प्रेम खरे असावे
शरीर जाळले तरी प्रेम मरत नाही

प्रेयसीचे सौदर्य कविता ने सांगतो
सजवलेले रूप तीचे कधी ढळत नाही

होतात गैरसमज दोघात सांगावे कुणी
माझेच खरे वाटे दुसर्यांचे जमत नाही 
______________________________
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
९फेब्रुवारी २०१७
7218613434

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

२०१७ नया साल

नया साल आया
प्यार भरा तुम्हारा साथ
जीवन साथी अब
हम बानेंगे खास है बात

एकेले जीता था
बदल गये रास्ते
अब जिना है
साथ तुम्हारे वास्ते

देख पगली
प्यार है तुमसे
मैं क्या अब मेरी
शायरी भी तुमसे

तुम आये जिंदगी मै
लेकर जिंदगी मैं बहार लेकर
नया है ये साल
ये प्यार भरा साल हमारा है
मुबारक हो २०१७

माफ कर

माफ कर मला

झाली चूक मोठी माझ्याकडून
समजून आले त्रास खूप झाला
तुला आणि मलाही
का मी असे वागलो तुझ्यासोबत
का आपली मैत्री छान
आ
वाटले मला तू समजून घेशील
पण नाही तो तर
मनाचा भास असेल
वाटले तू  तरी समजून घेशील
रडत होतो तुला कसे कळणार ,
तू दूर राहते
मी  गोंधळलो होतोच
त्यात तू मला दिसली
मनातले बाहेर आले
अन मोठी चूक झाली
चूक  मोठी जरी
त्याहून मन तुझे मोठे
वेडा म्हणत होती
आता खरच आहे तुझे
भरकटलो मी चूक झाली
मी तो नाही राहिलो
समोर नाही तरी
मनात विचार फक्त तुझे
प्रेमाचे नाही मैत्रीचे आहे
रूप नाही बघितले तुझं
सुंदर विचार आवडले
तुझी माझी मैत्री
झाली होती छान
त्या मैत्रीत दंग मी
मी कोण हेच विसरलो
चूक झाली माझी
इथेच चूक झाली
तू सुंदर खूप मनाने मोठी
या वेड्या सोब मैत्री केली
स्वार्थी आहे मी
तुला समजलेच असेल
मला माझी सफाई  नाही द्यायची
मी जसा आहे तसा आहे
चूक झाली मला मान्य आहे
मनाचा मोठेपणा मिरवत होतो
तिच्या शब्दाने माझी जागा कळली
तिने न बोलताच सर्व सांगून गेली
मूर्ख मी तिला दुखावले
मैत्रीचे भास सोडले
चूक झाली माझी
माफ कर मला
पहिल्या प्रेमाची आठवण
मला आज सतावून गेली
त्या आठवणीत झाले
मैत्राचे नाते विरळ
चूक झाली माझी
सांगत नाही तुझे नाव
काबुल मला मी चुकलो आहे
या प्रेमळ मैत्रीला मुकलो आहे
तू येशील पुन्हा
मनाला चुकीची जखम आहे
तू करशील मैत्री पुन्हा
पण मी
माझ्या हातून झाला गुन्हा


रंग चढला भरुडाला


रंग चढला भारुडाला
महाराजांच्या संगतीला
आनंद घेऊया सर्व
हरिनामाच्या पंगतीला

मृदंगची साथ लाभली
टाळ नादात वाजे
रंगात रंग भरून
नयनी दृश्य साजे

करूया जागर संस्कृतीचा
जगी महान नारी शक्ती
हेचि आपले भाग्य करू
मनी परमेश्वराची  भक्ती 

©धनराज भास्करराव भुमरे

भांडलो स्वतःशी

भांडलो स्वतःशी चूक झाली
दोष हळव्या वेड्या मनाचा
सावरलो पण सर्व हरवले
वाद हा सोडून गेलेल्या प्रेमाचा
©धनु

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

संस्कारी अवखळ परी (चित्रकाव्य)

चित्रकाव्य
संस्कारी अवखळ परी
______________________
अल्लड अशी गोंधळली
प्रार्थना कुणाकडे करते
कुणाची जाणीव कसली
एकटीच तू मग्न असते

स्वतःच्याच रंगात रंगते
जगू पाहते दुर्लक्ष करते
जिद्द शिकण्याची खरी
मग का मनी भीती धरते

ऐटीत उभी प्रार्थनेला
नियम चोख पाळते
सोबत शिदोरी असता
तरी भुकेला जाळते

गारवा हा अंगी भिनतो
चिमुकले हात घट्ट धरी
ओढ शिक्षणाची फार ते
न थांबता आत्मसात करी

सवंगड्यात एकटी पडे
वेगळीच भासते खरी
गोड़ गुणी बावरलेली
संस्कारी अवखळ परी
______________________
६ फेब्रुवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

भटकंती (चित्रकाव्य)

भटकंती (चित्रकाव्य)
_____________________
भटकंती चाले फार 
कशी मिटेल तहान
दूर वाट झाली ती 
पडली पावले लहान

कळेल का दुःख कुणा
अंगावर कपडा धड नाही
चिमुकले लेकरे वाहतात
भार त्यांना  जड नाही

हिंडून रानोरानी खूप
तुटली वाहने पायातली
मिळाले ना पाणी सहज
संपली शक्ती कायेतली

चटके बसतात अंगाला
अन कोरडाच तो घसा
कुठे मिळेना सावली
हिरव्या झाडांचा वसा

बनवल्या सडका काळ्या
टाकले तोडून हिरवे वन
खरी प्रगती झाली कुणाची
भ्रष्टाचाराने तुटलेच मन
_____________________
२९ जानेवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

आदरणीय डॉ. श्रीनिवास चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .......

आदरणीय डॉ. श्रीनिवास चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .......

श्री गणेशाला करून वंदन
मनोभावी साकडे घालतो 
दीर्घायुष्य लाभो तुम्हास
मागणे बाप्पाकडे मागतो

निखळ झरा ज्ञानाचा
नित्य वाहणारे पाणी
करून मार्गदर्शन आम्हा
तुमची गोड़ खूप वाणी

वास्तवाशी झगडून नेहमी
मजबूत वृक्षासम उभा
करता ज्ञानाचा जागर
सूर बघा घुमतोय नभा

सरस मनाचे अतिप्रिय
गुरू आमचे हे थोर
घेऊन आशीर्वाद त्यांचे
जीवा कसलाच नसे घोर

२ फेब्रुवारी २०१७
©कवी-धनराज भुमरे पाटील (पाचोड)
मु.पो. पाचोड ,
BCA TY
7218613434

थोरांची आशीर्वाद

थोरांचा आशीर्वाद का
आज वाटून घेतला आहे
टोचत आहे मनाला खूप
हा वाद उगी पेटला आहे
____________________
©धनराज भुमरे पाटील

प्रेम कुणावर करावे

प्रेम कुणावर करावे

साठवले काळेधन अमाप हे त्यांना कुणी सांगावे
जगतो तिथल्या पवित्र पावन मातीवर प्रेम करावे

भुलतात तनाच्या सौन्दर्यावर त्यांना कुणी सांगावे
नसे सुंदर कोकिळा, त्या मधुर वाणीवर प्रेम करावे

मोहापायी नीती विसरतात त्यांना कुणी सांगावे
सुगंध वेचणार्या मधमाशांच्या एकीवर प्रेम करावे

स्वार्थसाठी तोडतात वने त्यांना कुणी सांगावे
वादळ वारे झेलून उभा त्या झाडावर प्रेम करावे

रविवार, २९ जानेवारी, २०१७

माझ्यात रमतो विरह ...

माझ्यात रमतो विरह....
_______________________________
आठवणीच्या सागरात जाळतो विरह
प्रेमाने दिलेत घाव हृदयात माळतो विरह

होते दुःख मनाला प्रेम दूर कुठे जाताना
या एकटेपणात प्रत्येकाला छळतो विरह

सीमेवर लढणार मातेचा शूर सैनिक हा
सुखपासून दूर रक्षणासाठी भोगतो विरह

आस पावसाची तव तप्त धरनी दुष्काळी
शेतकरी आत्महत्येचे कारण बनतो विरह

स्वबल होण्यास धरला ध्यास शिक्षणाचा
वंचित त्यांना कसा बाहेर उडवतो विरह

बघून घराचे स्वप्न जाण्यास निघे शहरी
अन फाडक्याच गोधडीत लोळतो विरह

दिव्यंग असे तरी धावतो , दिसे ना काही
शोधीत वाट अंधारात वेगळा रंगतो विरह

निस्वार्थ प्रेम राधेचे यशोदेच्या कृष्णावर
बासरीच्या सुराने हा एकटा पडतो विरह

शोभून दिसे धनु आकाशी उधळीत सप्तरंग
प्रिय घाव झाला तो माझ्यात रमतो विरह
__________________________________
२९/जानेवारी/२०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

तो आणि ती ..college life

       तो आणि ती .....
      College life .
_____________________________
*अवखळ अशी कॉलेजात एक परी
त्याच्यासाठी ती खूप खास आहे
कट्यावर बसून तिचाच विचार
भेटणार  एकदा हीच आस आहे

*नजरेत भरली असे वेडावून
रोज वाट बघत एकटाच बसे
भान ना राहिले त्यास कसले
बघताच कुणी तव गालात हसे

*जिवंत प्रेमाचा झरा खळखळणारा
त्याच्या मनात नित्य वाहू लागला
ती हसून त्याच्याकडे बघताना तो
गोळक्यात ही चोरून पाहू लागला

*तळमळ जीवाची सर्वाना कळली
प्रेमकहाणीची सुरवात कशी झाली
चर्चा रोज तिची अन त्याची सुरु
हळुवार स्वप्नात सुंदरी अशी आली

*सुमन फुले बहरली हिरवळ मनी
अबोल प्रीत ही हळूच बोलून गेली
भाव चेहऱ्यावर लपवताना हसू
नजरेची गुंतागुंत सहज खोलून गेली

*जादु अशी झाली समोर बघताच
पहिल्याच नजरेत गुलाब फुलला
काय म्हणावं या प्रेमाला कळेना
बहरून मनी ऋतू वसंत खुलला

*तारकात वेगळाच दिसे नक्षत्र
चंद्र चांदणीच्या प्रीतीत दंगला
भावना ओळखून तव कवी
म्हणे जीव तुझ्यात  रंगला
_____________________________
२९-१-२०१७
©कवी:-धनराज भुमरे पाटील
BCA TY
Mo:-7218613434

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

पाहिजे....

पाहिजे
______________________________
मनी एकात्मीयता वाढायला पाहिजे
संकटकाळी सर्वांनी धावायला पाहिजे

होतात गरिबांवर खूप अन्याय  रोज 
भ्रष्टाचाराचा पुतळा पाडायला पाहिजे

स्वतः दुष्काळ मानवा ओढवून घेतला
जगण्यासाठी झाडे लावायला पाहिजे

अनाथ झाली माय , लेकरे घरामध्ये
मोहमायेचा पडदा फाडायला पाहिजे

जाती धर्माचे भांडणे सोडून आता 
भारतीय होऊन वागायला पाहिजे

आदर्श बालके घडवण्यास आईने  
वाघिणीचे दूध पाजायला पाहिजे

रक्षणासाठी आले वीरमरण सीमेवर
पुत्राची देशभक्ती आठवायला पाहिजे 
_______________________________
©धनराज भुमरे पाटील  (पाचोड)
३१/जानेवारी/२०१७
7218613434

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

येशील का

येशील का
__________________________
वाट पाहतो मन मोहरून येशील का
मैत्रीचा हात पुढे धरून येशील का

नकोच असे काही अनपेक्षित घडले
आनंदाची ओंजळ भरून  येशील का

अबोला हा सलतोय खुप मनाला
मनातला राग विसरून येशील का

कोमेजून गेली आता हृदयातील फुले
नाजूक फुलराणी बहरून येशील का

मनातही उसळल्या लाटा खूप आता
सागर वादळी पार करून येशील का
__________________________
२१ जानेवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील . (पाचोड)
मो:- 7218613434

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

तार काळजाची छेडून गेली (गझल)

___________________________________

झुळकासारखी हळुवार अलगद  येऊन  गेली
नको काही पुरावा  तुटलेली पाने घेऊन गेली

सळसळ करत वेलीतून मंद शीळ घालीत
गुंतलेल्या मनासोबत  डाव खेळून गेली

तुटलेले मन खुलून थोडे पुन्हा शहारले
त्याच मनावर आरोप खोटे ठेवून गेली 

सोबतच घालवली वेळ दिली होती साथ
राख होईल सर्व अशी आग पेटून गेली

पहिले नकोसे होते ते प्रेम पुन्हा झाले 
पुन्हा ती तार काळजाची छेडून गेली
_______________________________
१८ जानेवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील
मु.पो. पाचोड, ता. पैठण ,
जि. औरंगाबाद .
मो:-7218613434

खूप झालो वेडा

___________________
खूप झालो वेडा
कुठं पर्यंत धावेल
आता बघ फक्त 
वेड तुलाच लावेल
___________________
©धनराज भुमरे पाटील

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

जीव गेला जळून

जीव गेला  जळुन
___________________

सांग कळेल का कधी
तुझ्या मनात जसा
तुला फक्त एक बाजू
दिसलो तुला मी कसा

हरलो , विरलो प्रेमात
झाले का ते पुन्हा
भावना उसळल्या
एवढाच माझा गुन्हा

झाडाचे सुकलेले पान
पडले अलगद गळून
झुळूक आली अशी
जीव गेला जळून

माफ करशील का एकदा
चूक एका वेड्या मनाची
मिळेल का साथ रानाला
दूर असलेल्या त्या नभाची
________________________
©धनराज भुमरे पाटील (धनु)
7218613434
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण ,
जि. औरंगाबाद

सोमवार, २ जानेवारी, २०१७

चल रे गड्या (बालकविता)

चल रे गड्या
__________________________

सकाळ झाली घंटी वाजली
प्रार्थना आणि राष्टगीत गाऊ
सुविचार ऐकू बसून शिस्तीत
चल रे गड्या शाळेत जाऊ

उशिर होईल गड्या आता
चल वेळ जास्ती नको  लावू
छडी ची वाटते भीती मला
चल रे गड्या वेळवर जावू

हसू खेळू नवे धडे शिकू
शिकवले ते पाटीवर गिरवू
उगवत्या सूर्याचे चित्र रंगवू
चल रे गड्या अंधाराला मिटवू

अंगणी खेळू दमून जाऊ सगळे
छोटा भीम अन शक्तिमान पाहू
सुंदर विचार , छान मैत्री बघून
चल रे गड्या आपण एकत्र राहू

छोट्या छोट्या हातांनी 
मोठे स्वप्न पूर्ण करू
आई-बाबा करेल कौतुक
चल रे गड्या सुसंगत धरू

भारत मातेचे शूर सैनिक
लढताना सीमेवर जीव देऊ
शत्रूंना संपवून पराक्रम करू
चल रे गड्या स्वराज्याची शपथ घेऊ
__________________________________

२ जानेवारी २०१७
©धनराज भास्करराव भुमरे पाटील .
(अबोल भावना-धनु)
मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो. 7218613434