सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

सायंकाळी

सायंकाळी उधळीत जाई नभात रंग ,
विरघळतो  जसा पाण्यात उठे तरंग .

सायंकाळी सुटे पक्षांची हि शाळा ,
मनमोहक क्षण सर्वांनाच लावी लळा .

सायंकाळी शांत तांबड्या रंगाची शोभा ,
किलबिलाट फार पक्षाचा खेळ चाले नभा .

झुळझुळ पाणी शांत नदी हा  किनारा ,
रंगात रंग भरे पक्षी घेऊनि चिमनचारा .

चमकती रवी किरणे,  सोनेरी पानांचा थाट ,
लगभग चाले वेळ , धरावी घरची एकच वाट .

थांबावे कुणी वेळ कि भरभर चालावे किती ,
मनाला लागलेली हुरहुर वेगळीच हि भीती .

कुणाला छान कुणाला वाटे भयानक ,
असा का येतो हा अंधार अचानक .

सायंकाळी बघुनी त्या पाखरांचे थवे
मन उडे फार वाटे कुणी सोबती हवे ,

________________________________
©कवी :- धनराज भुमरे पाटील ,
पाचोड, ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434







शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

फेसबुक वरील काही अनुभव ..


*फेसबुक वरील काही अनुभव*
__________________________________________

फेसबुक हे सर्वात लोकप्रिय social media ,
त्यापासून मी कसा दूर राहणार ?
फेसबुक वापरायचे फायदे खूप आहे ,
आणि त्याच बरोबर तोटे ही आहे .
काहीतरी आयुष्याचा निर्णय घेतात ,
इथपर्यंत वापर करणे योग्य आहे का ?
हे एक व्यसन म्हणून सुद्धा चर्चेत आहे
सर्वाना माहिती असेलच ?

मी जेव्हा फेसबुक वापरास सुरवात केली तेव्हा खूप अनोळखी मित्र भेटले , आपल्याच विचारासारखे असणारे आवडी निवडी जवळ जवळ सारख्याच ,
रोज बोलणे होत असायचे अगदी जवळची मैत्री झाली जशी .
हळू हळू मलाही फेसबुकचे वेड लागले ,
अगदी 5 मिनिट हि वेळ भेटला की मी त्यात गुंग होऊन जायचो .
कित्येक वेळी धोका देणार असतात मुद्दाम  जाळ्यात अडकवतात , मी नवीन असल्याने एक ग्रुप ने मला प्रेमाने जवळ केले आणि एक मुलीच्या प्रेमात पडायला नकळत प्रोसाहन दिले अन मी  त्या जाळ्यात अडकलो ,काही दिवसाने त्या मुलीने पैशाची मागणी केली.
मी आपला विचार करत राहिलो पण शेवटी तिच्या टाकलेल्या जाळ्यात अडकलोच ना ,
असो ती रुपये घेऊन गेली पण मित्र खूप गमावले .
पैशाला कधीच किंमत नसते किंमत असते ती मित्रांचीच चांगल्या विचारांची किंमत अनमोल खजिना असतो तो तुमचा .
आता मात्र मी एकटाच आहे समजून आले ना की जे झाले ते खूप लवकर होऊन गेले ,
प्रेम कधीही होते एकदाच होते असेही नाही ,
पण पहिले प्रेम मात्र कुणी विसरू शकत नाही .
मी दूर झालो हे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी योग्य होते , आता पुन्हा नव्याने सुरवात करायची
अवघड आहे पण तो भूतकाळ होता ,
वर्तमान हा समजदार आहे पुढच्या भविष्यासाठी .
चांगले विचार म्हणजे न संपणार खजिना लुटत राहा आणि आपलाही खजिना वाढत जाईल ,
ज्ञान वाटत राहा ,
या पासून दूर राहायचे ठरवले तर मी माझे फेसबुक पेज तयार केले व त्या वर काम करत राहिलो कित्तेक मित्र भेटले मला पेज वर काम करण्यासाठी आणि त्यांनी चांगले काम केले विचार शेअर करून पण हॅकिंग मुळे ते पेज बंद पडावे लागेल,
माझा id हॅक होतोय अस समजताच  मी पेज बंद करून id ची  काjळी घेण्यासाठी काही दिवस फेसबुक ला राम राम केला ,
Wapka . Com  वर नकली फेसबुक पेज तयार केले जायचे व तिथे युजर नेम व पासवर्ड टाकताच ती माहिती त्यांच्याकडे जायची  नकली असल्याने ते पेज ओपन न होता पुन्हा त्याजागी यायचे ,
काळजी घ्यावी नेहमी फेसबुक वापरताने  अशा अनेक साईट आहेत जे हॅकिंग करतात ,
फेसबुक ने यावर नियंत्रण ठेवले आहे तरी आपणही खबरदारी घ्यावी .

कुणाला बदनाम करण्यासाठी का इतर काही कारणासाठी फेक/नकली अकॉउंट कडून त्रास देण्याचेही प्रमाण खुप आहे  अशा अकॉउंट ला आपल्या लिस्ट मध्ये भरती  करायचंच नाही ,
कधीही अंगलट येऊ शकते ,
नकली अकॉउंट फार काळ नाही टिकणार पण कमी वेळेमध्ये ते त्यांचे काम करून घेतात  ते बंद पडले कि पुन्हा दुसरा तयार ,
काळजी ही आपण घ्यायला हवी .
आता फेसबुक वरही वाद होत असतात काही वाद तर
खूपच त्रास  दायक असतात हे फक्त फेक अकॉउंट मुळेच होते अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.

खास करून मुलींना जास्त टार्गेट केलेले असते .
 ओळख नसताने  संदेश  पाठवतात हे चुकीचे नाही ,
पण विनाकारण सन्देश पाठवतात ,
मुलींना त्रास देतात त्यांना नाही वेळ कुणाशी बोलायला ,
मग का सतावतात msg बघून रिप्लाय देत नाही वगैरे वगैरे बोलतात , एकदा नाही म्हणून सांगितले तर 
वारंवार संदेश पाठवून त्रास का देतात ?
या बाबत मुलींना खूप त्रास होतो
त्यांच्या तक्रारी खूप आहेत कारण त्रास देणारा एक नसतो  असे अनेकजण असतात त्यांनी काळजी घ्यावी ब्लॉक पर्याय असतो कुणी त्रास दिला कि सरळ ब्लॉक करून मोकळं होयचं .
तर मुलींना/महिला यांना विनंती आहे की ज्यांच्याशी ओळख असेल असेच मित्र लिस्ट मध्ये असू द्या ,
नवीन कुणी असेल तर पूर्ण माहिती तपासूनच निर्णय घ्यावा ,
2 वर्षापूर्वी मुलींचे स्वतः फोटो अपलोड करण्याचे  प्रमाण फारच कमी होते ,
आज बघा किती प्रमाण आहे फोटो  अपलोड  ?
मला याबद्दल  काही अडचण नाही पण
फोटो  अपलोड/शेअर करताने खास काळजी  घेतली पाहिजे  , 
फेसबुक वर शिकण्यासाठी भरपूर आहे ,
फेसबुक चा चांगला काळजी पूर्वक वापर केला पाहिजे

बाकी गमतीदार गोष्टी खूप आहेत फेसबुक वर मन शोक्त पणे आनंद घ्यावा कुणी जोक्स शेअर करतात तर कुणी स्वःत जोक बनतात  , असा
अनुभव बहुदा सर्वानाच आला  असेलच ,
_______________________________________

फेसबुक वर माझी छोटीसी कविता

*आभासी दुनिया*

असतात अनोळखी मित्रमैत्रिणी वाटतात ओळखीची
फेसबुक अनोखी आभासी दुनिया भारी मनोरंजनाची
.
आभासी  असलेतरी ती आपल्याशी जोडलेली आहे, वास्तव नसेल पण वास्तवातूनच निर्माण झाली आहे .

मनमोकळे होते इथे मन माझे वेडेपिसे होते कधी , शोधातो कुणाला अन मला हि शोधावे कुणी कधी .

येण्या-जाण्याची वेळ नाही ठरलेली कुणाची ,
तरी वाट पाहतच राहतात इथे परत येण्याची .

_________________________________________
२७/११/२०१६
*©धनराज भुमरे पाटील*
*मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .*
*मो:- 7218613434*

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

वादळ

निळं  पिवळं  हिरवं ,
समजून घ्या अर्थ .
जसा आपला भगवं ,
तसं त्यांचं नको भांडण व्यर्थ ....
___________________________
२२/११/२०१६
©कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

चारोळी

ना कळे रंग राखेचा ,
उबदार आसन वाटे चूल .
अल्लड भाव ओळखीचा ,
नवखे गोंडस आईचे मुल

©धनु ...

मनात लपलेला कवी

२०/११/२०१६

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

माझी मायभूमी

..............माझी मायभूमी..............
_______________________________

जन्मलो इथल्याच पवित्र पावन मातीत,
रांगलो इथल्याच सर्वगुण संपन्न मातीत .
नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी  मायभूमी .

माझ्या मायभूमीत थोर किती जन्मले ,
समाजासाठीच पूर्ण आयुष्य वाहिले .
मातीत जिरलेलं रक्त खळखळतं नदीत ,
शुरांना वीरमरण लाभले या मायभूमीत .

कष्टी बळीराजा इथल्या काळ्या मातीत राबतो ,
आभाळाची माया जेव्हा पाऊस होऊन बरसतो .
दुष्काळाची होती शिक्षा चटके बसण्यासाठी ,
नका तोडू निसर्गाचे नियम या मायभूमीसाठी .

माय लेकरांची किती अतूट गोड़ गुंफण ,
चांगल्या विचारांचे आपण घालूया कुंपण .
बलात्कारी, भ्रष्टाचाराचा कचरा हटवण्यासाठी ,
मजबूत होऊन लढूया या मायभूमीसाठी .

नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी  मायभूमी .....
___________________________________
२१/११/२०१६
©कवी :-  धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद
मो :- 7218613434

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

कवींचा देव्हारा
साहित्य दर्पण
मन स्वच्छंदी
शब्द फुले अर्पण

....
धनु .....
२०/११/२०१६

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

चिमुक काटे

.................चिमुक काटे .........

आठवेल का कधी त्या तान्ह्या पायात टोचलेले ,
जपले किती आईने लेकराला कडेवर ऊचलेले .
जाणवेल का कधी आईच्या पायाला चटके बसलेले ,
सोडून गेली मायेला , बायकोला  चिटकून बसलेले .
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ....

आगळे वेगळे जरी हिरवळीत  प्रेमाने खुलले ,
वाळले झाड प्राण सुटता तरी बिलगुल बसले   .
जमिनीवर जसे छोटेसे चांदणे अवतरले .
सुकणार एक वेळ असे हे फुल बहरले
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ...

पुन्हा एक फुल  उमलून हसणार ,
रूप तुझेच तुला आता  दिसणार ,
चक्र हे ठरलेलं दिलं तेच भेटणार ,
म्हणशील जेव्हा तुलाही  समजणार ,
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ....
___________________________
१९/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

हसऱ्या डोळ्यातले

हसऱ्या डोळ्यातले फुल गाली  खुलले ,
केसाने जाळे विणले त्यात  मन गुंतले .
गुलाबी थंडीत जशी कळी  खुलावी ,
जीवघेणी अशी तुझी अदा वेड लावी .....

कवी :- धनराज भुमरे पाटील .
मो. 7218613434

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

कवी

____________________________________

वास्तवातून काव्य जन्माला घालणारा  कवी
कल्पवृक्षाचे रसाळगोड फळ  वाटणारा कवी

बालकाच्या शब्दात काव्य रचणारा  कवी
शब्द संगतीत निसर्गात रमणारा  कवी

अन्यायाला वाचा फोडवणारा  कवी
मनामना मध्ये डोकावणारा  कवी

कुठलाही वाद प्रेमाने संपवणारा कवी
ध्येयवेडे स्वप्नांना रंगवणारा कवी

विचारांचे  वादळ शब्दबद्ध करणारा  कवी
धारदार बनवून शब्दशस्र  धरणारा  कवी

प्रवास संपला तरी अथक चालवणारा कवी
अंधारातही सूर्य प्रकाश दाखवणारा कवी

_________________________________
२९/११/२०१६
©धनराज भुमरे पाटील ,
पाचोड, ता.पैठण ,जि. औरंगाबाद .
मो:- 7218613434

आली आली दिवाळी ...

आली आली  दिवाळी  आनंदाने घर गजबजलेला ,
आईकडे लागलेला बालहट्ट गोडधोड खायला  .
लहान होऊनि आनंद घेऊ पाहतो ,
मोठे हि सुरसुरी पेटवायला लागतो .
असते घर सदा खेळी-मेळीचे  ,
आठवतात क्षण त्या वेळीचे .

......... ✍
   धनु

लढण्यासाठी कर मनगट मजबूत ....

लढण्यासाठी  कर मनगट मजबूत ,
भाऊ आहे साथीला होऊ एकजुट ...
आई भवानी देईल लढायला शक्ती ,
करूयात राजे शिवरायांची भक्ती ....

  एक मराठा लाख मराठा

एकजूट मराठा 

जय भवानी , जय जिजाऊ ,
जय शिवराय , जय शंभूराजे ...

_________ _/*\_ ________
धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

शब्दात रंगतो स्वछंद .....

एकांतात एकटी तू ना भेटली कधी
मन माझे  वेडे थांबले  ना कधी
तुझ्याच त्या  पुसट आठवणी
तुझे माझे मन जुळेंना साजणी 

बोल माझे ना कधी ऐकले तू
का एकटीच  राहतेस तू
दूर कुठे  तुझ्याकडे माझे मन
शोधतो तुलाच हे माझे मन

मनाचा हा वारा वाहतोय ग
तुझ्याच दिशेने परतून येतो ग
ओढ तुझीच ती मला
अनोखा रंग आपला

स्वप्नात हि तुझाच चेहरा आधी  दिसला
प्रीत  जुळवण्याचा प्रयत्न पुन्हा फसला
येतेस अशी अनोळखी सखी
माझ्या मनात  परीसारखी

तूझाच मला येतो सुगंध
शब्दात रंगतो स्वछंद....
शब्दात रंगतो स्वछंद....

कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

शेतकरी खूप त्रासाला आहे ...

शेतकरी  खूप त्रासला  आहे ,
लुटणार्यानी व्यापला आहे .
शब्द त्याचे  त्यांचेच नांगर ,
दिनस-रात करतो  मरमर .

त्याचाच का आवाज दाबल्या जातोय ।
शेतकरी  कर्जात बुडाल्या जातोय ।
आपल्याच शेताच्या रक्षणाचे तुटताना पाहतो कुंपण ...
आहे तो बळीराजा बाप सर्वांचा त्रास भोगतोय तरीपण...
_________________ धनु ...

२८/१०/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

मनाचे दुखणे

काय सांगणार मनाचे दुखणे ,
जमते फक्त तिचेच अश्रू पुसणे .
वाट झाली दोघांची आता  वेगळी ,
रंगवलेल्या चित्राची मात्र रेखाच राहिली ....

_____________ धनु ...

१०/१०/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

तू शायर तो मेरी कविता भी कुछ कम नही ...

एक वेगळीच मैत्री आपली ,
नकळत  आपण जपली .
होतो नेहमी सोबत शाळेमध्ये ,
तरी पण अनोळखी साच्या मध्ये.

नंतर वाढत गेली मैत्री आपली ,
मैत्रीची सूत्रे जेव्हा  कळली .
तुझी मात्र चाले धडपड body बनवायची ,
मी फक्त माज्या  घेत होतो तुला चिडवायची ,

तुही  हि चिडवण्याची  संधी नाही सोडली  .
मी झाडावर चढताना  तेव्हा फांदीच मोडली ,
सायकल चालवत कचोरी खायला जायचो ,
इतके मोठे झालो तरी जोरातच   पळायचो ,

तू तिखट मी मात्र थोडी  कमीच  सांगायचो ,
बिल तू  का मी देणार  हाच विषय घोळायचो .
आता तर कधी तरी अन गरबडीत भेटायचं ,
पण कचोरी खायला  नाही कधी विसरायचं .

तू शायर तो  मेरी कविता भी  कुछ  कम नाही ,
तू  बोलता था तब  मुझे तेरे बात मे दम नाही .
देखो आज  तुझे वो दिन याद आयेंगे ,
उसी बात पे आज भी झगडे हो जायेंगे .

..............
........ ✍
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

तुला कधी मी दिसलोच नाही.....

प्रेमाच्या वाटेवर मी खूप पुढे आलो ,
तू तू करताना तुझ्यातच हरवलो .
घेऊन स्वप्न तुझे रंगवलित चित्र ,
विचार तुझा करताना सरते रात्र ...

प्रेमाची पहाट मनासारखी कधी झालीच नाही ,
एकट्या प्रेमाच्या वाटेवर तुलाच शोधात राही .
तू आहे तशी  तिथंच राहिली ,
मी मात्र प्रेमाची फुले वाहिली .

नाही समजणार मन तुझे मला ,
कारण आहे तुझा तोच अबोला .
नाही राहिले आता बाकी काही ,
तू एकही शब्द  बोलली नाही …

समोरच होतो
तुला कधी मी दिसलोच नाही .....
तुला कधी मी दिसलोच नाही....

_________________धनु
१७/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

धुक्यातली तू एक परी

धुक्यातली तू एक परी ,  वाटे दूर जरी ,
हळूच बरसते तू जशी जणू पावसाची सरी .
शहरतो ग मी , रूप  तुझे  पाहून ,
बघता क्षणी जाते  मन माझे वाहून ....
  ........ धनु

मनात माझ्या शब्द घोळू लागले ....

शब्दच झाले आता आपले ,
जसे कि तुला मनात जपले .

भावना माझ्या समजून घे ,
चोरी झाली मनाची उमजून घे .

नाही तुझ्यासारखे कुणीच ,
कवी झालो हा भास का उगीच.

शब्द आहे माझ्या मनातले ,
जगात कुठे तरी हेच ऐकलेले .

हक्क नाही माझा या शब्दावर ,
मोकळ्या भावना मात्र तुझ्यावर .

तुझ्यामुळे  कवी कवी  मला ही म्हणायला लागले !
सांग यामध्ये कविसारखे काय दिसायला लागले ?.

मनात माझ्या शब्द घोळू लागले ,
तुझ्या आठवणीत खेळू लागले ....

_____________________ धनु ...

कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

मैं क्या मेरी शायरी भी तुमसे .

पाहिले तुला जीवन कळले मला ,
तुझ्या नजरेने खूप छळले मला .

दूर तर आहेच तुझ्यापासून  का  रडतेस ,
तू प्रेम नाही करत माझ्यावर का  रुसतेस .

देख पगली प्यार है तुमसे ...
में क्या मेरी शायरी भी तुमसे ...
_____________धनु ...

कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

सुंदर मुली माझ्यावर मारतात आज कळले .


फिरत होतो तुझ्या साठी घेऊन नवी गाडी ,
पेट्रोल जळत होते खिश्याला लावली काडी .
तू नकार दिल्यावर नशीब माझे फळले ,
सुंदर मुली माझ्यावर मारतात आज कळले .

........................ धनु ..
१५/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

मी हरवून जातो पुन्हा तुझा विचार येताच..

हरवून जातो तुझा विचार येताच.....

असे जुळतात माझे हे शब्द तुझ्यासाठी ,
अबोल भावना असतात समजण्यासाठी .

का गं माझं वागणे तुला आवडेना ,
माझ्या जीवाला चैन काही पडेना .

होत आहे नुसती मनाची ओढाताण ,
जसा  टोचतोय माझ्या हृदयात बाण .

मी का करतोय विचार माझ्या पुरताच ,
हरवून जातो पुन्हा मी तुझा विचार येताच .

_______________अबोल भावना .

८/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

सोडली दारू आता घरची वाट धरू ....


हो मी पिलो होतो एकदा दारू...
बदनामी झाली होती  काय करू...
हरलो होतो प्रेमात दिसली मला पारु ....
सोडली दारू आता घरची वाट धरू....

________धनु...

वाढीवसाच्या शुभेच्छा .....

वाढदिवसाला तुझ्या फुल सुंगंध पसारवणार .
यश मिळो पावलो पावली थोडे काटेही असणार .
सुख असेल तिथेच पाऊल पडो.
सहवास चांगला तसेच कार्य घडो .
सखे सोबती हीच संगती भारी .
आई-बाबाचे प्रेम मनगटात बळ देणारी .
वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख हार्दिक शुभेच्छा ........ ...

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

स्त्री सौदर्य

निसर्गासारखे  नाजूक स्त्री पवित्र दरवळणारा सुगंध ..
मनमोहक सुंदर गुलाबापरी  देऊन जाणारागुलकंद ..
संघर्षी जीवन अमुल्य कोहिनूर  सहनशीलतेचा …
काळोखात आधार देतात  नभात चांदण्याचा...

स्त्री सौदर्याची व्याख्या कोण करणार ....
जननी सृष्टीची चहूंकडेच तीच दिसणार...
प्रणाम प्रथम माझे जगत जननीला ....
रांगतो तिथल्या  पवित्र मातीला ....

_____________धनु...

कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड ,  जिल्हा औरंगाबाद .
मो :-  7218613434

इवले इवले नाजूक पाऊल चाल रणराघिणीची ....

इवले इवले नाजूक पाऊल चाल रणराघिणीची .
सुंदर परी शोभते अस्सल मराठी लेक माऊलीची .
ध्येयाकडे वाटचाल घुमू दे नाद तुझ्या  पावलांचा
वाटचाल तुझी स्वप्नाकडे सुगंध दरवळला फुलांचा .

कवी :-  धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो. 7218613434

थंडीचा तो शहारनारा वारा

थंडीचा तो शहारणारा वारा ,
कडकुडतोय वाजले माझे बारा ,
शरीराचा उतरलाय  आता  पारा ,
जागतोय तरीही   तो शेतकरी खरा .

शेतीला पाणी पीक खुलतंय ,
बहरलेले रान छान दिसतंय ,
झुळकाने पान कसं दिसतंय ,
खुदकन पोर गालात  हसतंय .
...........धनु ..

असच लिहिले

आईने केले असेल बेसन अन पुरी .
अहो बोलवा आम्हाला येतो घरी .
भेटुद्या थोडी आईची माया आम्हाला.
जावा कि राव लवकर परी बोलावते तुम्हाला .

शिवप्रताप अफजल खान भेट

.............शिव प्रताप .........

शिवराय माझे पराक्रमी राजे हाती तलवार ,
आई  भवानी  ची कृपा अजून आहे धारदार .

हर हर महादेव जयघोष करुनी ,
स्वराज्य स्वप्न साकार करुनी .

जिजाऊ  मातेचे थोर फार उपकार ,
शिवराय  जनतेच्या दुःखाचे जाणकार .

कणखर प्रवास होता कितीहि भयानक ,
परतून लावले संकट आले जरी अचानक .

अफजल खान ने बेत काय तो ठरवला  ,
महाराजांनी सहज असा  त्यास फाडला .

.........….जय शिवराय ..........
८/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील

झुलत झुलत येणार मी तुझ्याकडे

झुलत झुलत येणार मी तुझ्याकडे .
चार दिसशील  दोनच डोळे माझ्याकडे .
वळतात पाय पहिले तुझ्याच घराकडे .
लोक हसतील  पोरगा  चाल्ला कुणीकडे .

............ धनु

हो पिलो होतो मी दारू

हो मी पिलो होतो एकदा दारू
बदनामी झाली होती  काय करू
हरलो प्रेमात मी दिसली मला पारु .
सोडली दारू आता घरची वाट धरू

......धनु

सांग पोरी अस रुसू नको

सांग सांग पोरी अस रुसू नको ।
नाकावरचा लटका राग लपवू नको .
बघत राहू दे मजला , तू लाजू नको .
सांग पोरी काय झाले , चूप राहू नको .

..............धनु

नशा कवितेची

कवितांचीच आज नशा चढली .
मनमुराद जगले जिंदगी वाचली .
डुबणार होतो मी प्रेमाने .
तारले मला या शब्दाने .

...........धनु

तिची शपथ

............तिची शपथ ..........

नाव तुझेच मनात लपलेले ओठांवर ,
शपता देऊन मुठीत जीव काट्यावर .
नाव सखे तुझे कस विसरू गं मी ,
तिची शपथ म्हणताच , हरतो गं मी .

............अबोल भावना ....धनु ...
कवी:-  धनराज भुमरे पाटील .
पाचोड , जिल्हा औरंगाबाद
मो : 7218613434

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

...........प्रेमाच्या गावातील कल्पवृक्ष


मनाच्या ढगातून गोड़ , शब्दांचा पाऊस  बरसेल ,
हृदयाच्या रानात चहूकडे , कवितांची हिरवळ बहरेल .

कवी एक रोप कौतुकाच्या वाऱ्याने खळखळ हसेल , गालातले ते सळसळत्या पानात स्वच्छ हसू दिसेल .

वास्तवात  हि कल्पनेची मनाची अशी सुंदर दुनिया ,
तुटलेले  मनाच्या जखमा भरे रसाळ फळाची किमया .

झाड होऊन तेही देतील रसाळ फळे खूप गोड़ असेल
प्रेमाच्या गावातले  ते कल्पवृक्ष  सर्वांसाठीच असेल .

_______________________________

१७/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

मला स्वछंदी कवी बनायचे आहे .....

मला स्वछंदी कवी बनायचे आहे......

निसर्गाकडून मला खूप खूप शिकायचे  आहे ,
शब्दांची बीजे घेवून सुगंधी फुल फुलवायचे आहे ,
सुंगधी मोकळ्या वातावरणात मला खेळायचे आहे ,
शर्यतीत धावताना पडलो तरी उठून पळायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ......

मनापासून मला कवितेचे रोप लावायचे आहे
शब्दांची शेतीस मनापासून जपायचे आहे ,
टोचतील खूप काटे-कुटे सहन करायचे आहे ,
लपवून सारे दुःख सुगंध पसरावयाचे आहे ,.
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

कौतुकाच्या पावसात मला पण भिजायचे आहे ,
फुलणारे एक एक नाजूक रोप जगवायचे आहे ,
पहाटे पडणार्या धुक्यात मला हरवायचे आहे ,
पानावरचे अनमोल ते मोती  शोधायचे आहे .
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

गावाकडे मला  मुक्त मोकळे बागडायचे आहे ,
प्रसन्न  फुलांना घेऊन शहरास हरवायचे आहे ,
सुगधं घेऊन फुलांचा रसाळ फळ चाखायचे आहे ,
चोरून आणताना फसगत ते क्षण आठवायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ......

निसर्गाकडून  मला अजून खूप काही शिकायचे आहे ,
कणखरपणा अंगी तरीही गोडवा टिकवायचा आहे ,
ऊन वाऱ्यासारखे संकट मला झेलायचे आहे ,
वादळा नंतरही मला तग धरून राहायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ……

फुलपाखरू होऊन मला थोडेसे जगायचे आहे ,
फुलांचा सुंगंध अन पंखात रंग भरायचे आहे ,
नाजूक सुगंधी फुल रंगीत बनायचे आहे ,
फुलपाखराच्या पंखात रंग भरायचे  आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे......

नाजूक वेल होऊन मैत्रीचे झाड जपायचे आहे ,
वेल होऊन मला मित्रांना बिलगून राहायचे आहे ,
नभात मन पाखरू होऊन  भिरभिरायचे आहे ,
सुंदर झाडावर प्रेमाचे एक घरटे बांधायचे आहे .
मला स्वछंदी कवी  बनायचे आहे ......

जगताना स्वप्नपरीच्या प्रेमात पडायचे आहे ,
गैरसमजाचे ते गणित मला सोडायचे आहे ,
दुरावा तो येणारच सहन करायचे आहे ,
बाष्प होऊन पुन्हा थेंबाने परतायचे आहे .
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

सीमेवर लढणारा शूर सैनिक बनायचे आहे ,
भारत मातेच्या रक्षणास मजबूत बनायचे आहे ,
अन्यायाच्या  विरुद्ध जोशात लढायचे आहे ,
एकीच्या बंधनाचा अतूट धागा बनायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे.....

इमानदारीने माणुसकीचे गुण अंगी बाळगायचे आहे ,
आई-बाबाचा लाडकं लेकरू लहानच राहायचे आहे ,
शेतात कष्ट करून रात्री शांत पणे झोपायचे आहे ,
इथल्या काळ्या मातीत मला शेवटी मरायचे आहे.....
मला स्वच्छंदी कवी  बनायचे आहे ....

मला स्वच्छंदी  कवी  बनायचे आहे ....
....................................................

१७/११/२०१६
©कवी :- धनराज भास्करराव भुमरे पाटील .
पाचोड ,ता .पैठण  जि. औरंगाबाद .
मो : 7218613434

नोटा बंद

............नोटा बंद.........

नोटा बंद  झाल्या , अशी बातमी ऐकली ,
भामट्याना  जणू मनात , धडकी  भरली .

का कुणास ठाऊक , कशे व्यवहार होतील  ,
काही दिवस ओढाताण , चांगल्या साठी घेतील .

पळून जातील भ्रष्टचारी , असतात  चोरवाट .
हा निर्णय बघून वाटेत , काटे आहे खूप दाट .

.........................धनु.✍
��८/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड ।
मो:- 7218613434