बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

शेती आणि शेतकरी


शेतकरी
____________________

कसदार  माती  काळी
मिळते  ढगांची माया
राबून  तो  पीकवतो
रानी झिजवून काया

उभे  पीक  बहरते
घरी येते थोडे धान्य ?
दुष्काळ  येताच  हाल
कडू सत्य आहे मान्य ?

गाय  माता, बैलांना
बाप आपले मानतो
मुक्या जीवाचे बोल
दुःख मनाचे जाणतो

पोशिंदा जगाचा तरी
गरिबी  सोडेना  पाठ
दुःखाच्या रेषा दारी
सुखाची सैल ती गाठ

बैला  संगे  करे  काम
शेती त्याचे चारी धाम
कष्टाचा  अमुल्य घाम
घेतो  मुखी  हरी  नाम

पीक नाही पानी नाही
दुष्काळी वार झेलतो
पुन्हा सुरवात होता
ओझे कर्जाचे पेलतो

जगी  एक  सर्वश्रेष्ठ
माय  लेकरांचे  नाते
भरवते  घास  बाळा
पक्षीही  सुरात गाते

साथ मिळो पावसाची
हिरवी  राने  असावी
गुरे  आनंदी  गोकुळी
पाना-फुलात  हसावी
_____________________
©धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड ता. पैठण ,
जि.औरंगाबाद .
मो :- 7218613434





सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

रस्ते अन खड्डे

रस्ते अन खड्डे
_______________________________

रस्ता आणि खड्डे गट्टी जमली भारी
चुकवून जाऊ दक्षता आपणच घ्यावी
प्रश्न कसा सुटणार खड्ड्याचा आता
कोणती नेते मंडळी निवडून द्यावी 

वर वरचे प्रेम सर्वानाच कळू लागले
कुठे खड्यात पाणी रस्ते वाहून गेले
कुणाच्या जीवनाची वाट चुकली दारूने
खड्डे चुकवताना निष्पाप प्रवाशी मेले

चूक केली खूप उशिरा समजते लोकांना
टेबला खालचे खाते चालते त्यांचे लपून
वाट लावली रस्त्याची पडले खड्डे
कळून सर्व पाऊल टाकावे लागते जपून 
__________________________________
©धनराज भुमरे पाटील
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण , जि. औरंगाबाद.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

मन ......

मन
_____________________________

वेगळेच असते मनाचे अतूट बंधन
मन मनाचा कैदी प्रेमाने फसते मन

गरिबीच्या घरात प्रेमाने हसते मन
घर छोटे गरिबांचे मोठे असते  मन

एकमेकांसाठी धावते आपलेच मन
आपले असून हे आपले नसते मन

गरिबी-श्रीमंती नसते मैत्रीत व्यर्थ धन
फक्त विश्वासाने प्रत्येक नाती जपते मन

दूर कुणी जाताच आठवतो प्रत्येक क्षण
एकांतात प्रेमाच्या विरहाने हे रडते मन

दुःखाच्या वादळात मनी दाटून येतात घन
आतल्या-आत घुसमटत राहत असते मन

तुटले हृदय बसतो घाव दिसत नाही वण
नकाराच्या वाटेवर धावत असते मन

प्रेमाच्या फुलावर रंगीत सुगंधी पराग कण
स्वप्नाच्या पंखावर प्रीतीचे रंग भरते मन

प्रेमाच्या अलगद स्पर्शाने शहारते तन
बाहुपाशात येताच लाजिरवाणे हसते मन

अनोळखी कुणीच्या भिडता नयनास नयन
क्षणात प्रेमात पडणारे आपलेच असते मन

प्रीतीच्या पावसाने प्रेमाचे बहरते वन
पानाफुलात झुळूक होऊन पळते मन

आयुष्याच्या वाटेवर एक असते वळण
प्रेमाच्या खेळत कधी जिंकूनही हरते मन

प्रेमाची कधी तिरस्काराची होते इथे उधळण
नेहमी एकांतात आपल्या सोबत असते मन

__________________________________
१५ डिसेम्बर २०१६
©कवी :- धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
ई-मेल :- dhanrajbhumarepatil@gmail.com*
Mo :- 7218613434

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

काळजी पूर्वक पैसे खर्च करा ....

काळजी पूर्वक पैसे खर्च करा 

आज काल बचत म्हणजे  सर्व ठिकाणी बचत करावीच लागणार आहे , काही ठिकाणी विनाकारण खर्च  करून मोठेपणा दाखवतात ,
इथे फक्त पैसे उधळायला प्रश्न  नाही इथे विषय आहे पैशामुळे होणारी लग्न कार्य, वाढदिवस , पार्टी , विनाकारण पेट्रोल जाळणे , आणि खास करून मोठे लोक पैशाची किंमत कमी करतात त्यांच्यासाठी काम महत्वाचे असते ,असले पाहिजे  पण जिथे नुकसान फार होते पण दिसत नाही धावपळीत कुणाचे लक्ष जाते का प्रवास करताने किती खर्च ,
शिदोरी कुणी सोबत घेऊन जाताना दिसताच नाही बोटवर मोजण्या इतके असतील जे अजूनही पैशाची किंमत करतात ,
प्रत्येक गोष्टीत काटकसर करतात , काटकसर नेमकी काय तर  जेवढे हवे आहे तेवढे घेतले पाहिजे आता प्रश्न नको की काय घेतात प्रत्येक गोष्टीत काटकसर पाहिजे , मग ज्ञान तर खुप घेतले पाहिजे पण असे ही नाही की खूप ज्ञान प्राप्त करण्यासाठी चुकीची माहिती हाती नको लागायला,
लग्नकार्यांत खूप खर्च करा पण सगळे नियोजन असले पाहिजे अन्न वाया जाऊ देने ही एक गंभीर बाब मनामध्ये ठेवून मोजकेच वाढले पाहिजे , आता काय आली स्वतः घायचे आणि जेवायचे बफे पद्दत , ज्यांना गरजच नाही ते जास्तीचे जेवण ताटात घेतात आणि नाही सरले की तसेच न फेकून दिले जाते पर्याय नसतो ना तेव्हा ,
वाढदिवसालाही पैसे उधळण  पार्टी  , जर घरगुती कार्यक्रम करतात घरी असल्याने काळजी घेतली जाते पण बाहेर पार्टी तरुणांची दारू पिणे हे हमखास ठरलेले असते , मग झिंगून ते काय किती उधळण करतात काय तर  आनंद  पहिला जातो ना  हे थांबले पाहिजे.
खास करून छोट्या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाही  खर्च करताने आपण किती काही गोष्टी ची विनाकारण संपवतो किंवा फेकून देतो ,
आपन चांगले दिसण्यासाठी भारी कपडे , महागडा फोन पाहिजे ,
पण नेहमी जुन्या गोष्टीचा वापर प्रयत्न, नेमकी काय करतो , ती वस्तू वापण्यायोग्य असली तेही अडगळीत टाकतो आणि  नवीन वस्तू घेतो ,
नवीन वस्तू येते पैसे खर्च झाले ,
प्रत्येक वस्तूचा पुरेपुर फायदा घेतला पाहिजे ,
आता अजून एक प्रश्न निर्माण झाला कि जुन्या काही वस्तू ने काम लवकर काम होत नाही म्हणजे वेळ वाया जातो ,
आजकाल तरुणांना भारी स्मार्ट फोन पाहिजे गरज नसताने ज्यांना गरजेचे आहे त्यांना मिळत नाही हा नशिबाचा खेळ आहे , गरिबी आणि श्रीमंती यामध्ये खुप फरक जाणवतो पैशाने श्रीमती  असलेली लोक  पैसे वाचवत नाही याच बरोबर पैशामुळे खूप गोष्टीही ते सहज फेकून देतात ,
आजकाल पैशाला महत्व आहे कि गुणांना आहे हेच कळत नाही ?,
माणसात माणुसकीचे गुण कमी होत चालले आहे
ते वाचवणे फार गरजेचे आहे ,

आता बघा एखादा भूकेने व्याकुळ झाला आहे आणि बाहेर कुठे असताने जर हॉटेलात गेला तर जो फक्त जेवण करून भूक मिटवतो पण त्याच हॉटेल मध्ये काही फक्त हौस म्हणून येतात , इथे अन्न वाया जातेच पैसे वाया जातात , आणि वेळ ही वाया जाते ती कशी तर बघा भूक नसताने  हॉटेल मध्ये जाणे वेळ वाया घालवने आहे ,
अजून खुप काही गोष्टी आहेत पण  ,
तुमचा वेळ न घेता थांबतो तुम्ही समजदार आहात  कारण मला असे वाटत आहे ज्या अर्थी वाचन करत आहात  तुम्ही  नक्की अशा  गोष्टीचा विचार करतात , पण ज्यांच्या  पर्यंत  ही माहिती जाणे गरजेचे आहे तेच मात्र दुलक्ष करून , पैशे उधळतात  त्या बरोबर इतर गोष्टी ही नकळत वाया जाणारच ,
तर काळजी पूर्वक पैसेखर्च करा ,
तरच तुम्ही खुश राहाल .
आणि  चांगले गुण टिकवून ठेवा,
तरच पुढचा  येणार काळ सुखाचा राहील
_____________________________

©कवी:-धनराज भुमरे पाटील
मु. पो. पाचोड , ता. पैठण ,जि. औरंगाबाद ,
ई-मेल :- dhanrajbhumarepatil@gmail.com
Mo:- 7218613434

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

व्यसने ......तोच खरा व्यसनाने जगतो

व्यसने
_______________________

काय झाले आज काल
काय दारू काय गुटखा
रस्त्यावर गर्दीत कुठेही
मारतात सिगरेटचा सुटका

कॉलेजच्या आवारात कधी
मुलींसाठी बस स्टॉप वर
टुकार त्यांच्या वाईट नजरा
हेच काम त्याचे दिवस भर

बघून असतो शांत आपण
असतो आपलाच सोबती
व्यसनाच्या आहारी जाऊन
हलू हळू  आतडे  सोलती

म्हणती सारे हा तर
माझ्या दुःखाचा एक भाग
कधी सुटेल हे सर्व
कधी येईल यांना जाग

वाईट असूनही घेतात
भीती असते तरीही खातात
व्यसनासाठी जीव हि घेतात
झिंगून पडले घरचे घेऊन जातात

स्वतःची फजिती अन दुसर्याचीही
नको असते काम एक विचार असतो
कुणाचे काही घेणे देणे नाही
हा फक्त व्यसनासाठीच जगतो

प्रत्येक जण हा व्यसनच करतो
चांगले व्यसन कोणते प्रश्न पडतो
माती साठी माती होऊन जातो
तोच खरा व्यसनाने जगतो

तोच  खरा व्यसनाने जगतो

____________________________
१०/१२/२०१६
©धनराज भुमरे पाटील
मु.पो. पाचोड ,
ता.पैठण ,
जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

तुला भेटायला आलो

तुला भेटायला आलो खूप दूर तू राहतेस
भेटीची ओढ दोघांना ही लागलेली झालो होतो आतुर
असच एकदा मनात आले
बसलो गाडी चालू केली
आणि निघालो तुझ्याकडे
तुझे लग्न होते
वेळेवर पोहचायला हवे होते ना
वेग वाढवला पण काय फायदा
गाडीच पंचर  झाली ग
तरीपण चालवली गॅरेज शोधले
दुरुस्त केली गाडी आणि निघालो
किती दूर दूर राहतेस तू
3 तास लागले मला एकूण
मग गिफ्ट काय घेऊ समजेना
मित्राला  सोबत आणले असते तर
सुचले असते ना
पण लग्न तुझं मी तरी काय करणार
माझी होती तू आज दुसर्याची होणार कस जमेल  तुझ्या हात
दुसऱ्या हातात पाहून
सावरू शकेल का स्वतःला
नाही ग मी कोलमंडतोय
हरतोय इथे
जगतोय फक्त
तुझ्यासाठी
आलो  दूर तुझ्यासाठी
तुझाच लग्न बघायला
तू शपथ घातली
अन यावे लागले
नको नको म्हणत होतो मी
शेवटी शेवटचे बघायचे ठरवले
आणि तेच शेवटचे क्षण
आजही मनात जिवंत आहे
समोर आहे
तुझा तो हसरा चेहरा
अन डोळ्यात पाणी
पहिले मी तुला दिसले का
तुझ्या डोळ्यातले लपवले
माझे मी लपवत होतो
कस समजेल तुला
आजही तुझ्या फोन ची वाट
पाहतो झाडाखाली बसून
तीच वेळ
तेच झाड
तीच आठवण
आजही तू माझी आहे
आणि माझं हृदय तुझ्याकडेच आहे
माझे कुठे ठेवले तू हृदय
नाही माहिती
तुलाही आठवण येत असेल
आणि येणारच
तूच प्रेम दिले मला
तूच सावरले मला
आणि तूच सोडून गेली मला
तूच समजावले  मला
तूच आहे ती
जिने मला पुढचे जीवन जगायला सांगितले
तूच आहेस ग आजही
तू तू आणि फक्त तूच
मनात हृदयात
स्वप्नात डोळ्यात
फक्त तुच
झाकलेल्या डोळ्यात
उघड्या पापण्यात
ओले अश्रू ही फक्त तू

शेवटी राहिली फक्त तू

मी कुठे हरवलो
मी नाही राहिलो तुझा तो पूर्वीचा धनु 
तूच बदलून टाकले मला
विरहात लिहायला लावले मला
प्रेमात असताना आठवणी दिल्या
आता  रेखाटतो आहे एक एक करून
पुन्हा पुन्हा लिहतोय
लिहतोय फक्त लिहतोय
कुणाल दाखवत नाही
कुणाला सांगू मी
लिहलेले फक्त तुझ्यासाठी
तू कुठं आहेस आता बघायला
कुणासाठ हसू मी
तू केलीस सुरवात नव्याने
मी  काय करू सांग जरा
विचारतोय तुझ्या आठवणींना
सोबत असेल तर सांग कुणी
तुझ्या सारखीच पाहिजे
तू का नको मला
तुझ्या पेक्षा चांगल्या  असेल ग
पण तू मनातून जात नाही ना
किती लिहू
किती सांगू
कोण  ऐकणार माझे
तू ऐकायची रागवायची
बस कर नाटके म्हणायची
मला मारायची तू
किती किती ते प्रेम
आणि किती आता दुःख
आयुष्य कमी पडेल
क्षणो क्षणी वाढत जात आहे
शब्दन शब्द तुझ्या आठवणीतून
येतोय पुन्हा नव्याने
अजून घाव बसतोयच आहे
थांबतो आता खुप आहे आजून
त्रास होतोय मला
तुझाच मी

पण तो भूतकाळ माझा 
सोबत असतो  माझ्या
मला सावरायला
मला वाट दाखवायला
पुन्हा जगायला लावणारा
वाट पाहायला
अजून बसून ठेवले मला
कुणाची वाट बघत
तसाच एकटा मी
आणि दूर ती  माझी स्वप्ने
कधी  जवळ येतात मृगजळ बनून

सखे तुझ्या जाण्याने हृदयावर घाव बसला

सखे तुझ्या जाण्याने हृदयावर घाव बसला
______________________________

प्रेमाच्या खेळात नेहमी होत असे बाद
तू खुप लाजाळू घालत बसायचो वाद

हवी होती तुझ्यासारखीच प्रेमाने  बोलणारी
लपवलेल माझ्या मनातले गुपित खोलणारी

नेहमी वाट बघायचो येशील कधीतरी
तुझ्यासारख्या सुंदर शांत नदितीरी

त्रास होतोय तुझ्याशिवाय जगण्याचा
ऐकशील का मनातला आवाज रडण्याचा

तू कधी माझ्यासमोर थेट रडली नाही
जाताना वळणारवर भेट घडली नाही

समजून दिले नाही कधी आपल्यातले अंतर
एकजीव होता समजले तू दूर गेल्या नंतर

मनात माझ्या आजही तुझा आभास कसला
सखे तुझ्या जाण्याने हृदयावर घाव बसला

_____________________________________
५/१२/२०१६
© धनराज भुमरे पाटील
मु.पो. पाचोड , ता. पैठण ,
जि. औरंगाबाद ,
मो :- 7218613434 .

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

प्रेमरुपी पाऊस

   प्रेमरुपी पाऊस

________________________________

प्रेम म्हटले कि मला आधी प्रश्न पडला
अर्थ प्रेमाचा समजून मनात अडकला

प्रेम हे सर्वाना न समजणारे एक कोडे
मिळते ना मिळते कधी जास्त कधी थोडे

प्रेमाला जिंकता येते प्रेमाने फक्त
खरे असूनही भीती होण्यास व्यक्त

दिसते प्रेमात असताना प्रेम सर्वत्र
दोन जीव मनाने होतात जेव्हा एकत्र

पाऊस होऊन येतो तर कधी वारे
चिंब भिजून जातात वादळात सारे

भेभान झालो मी जेव्हा तू दिसली
बघतच राहिलो पावसात तु भिजली

प्रेमाने चिंब लाली गालावर सजली
मन शहारून गेले लाजून तू हसली

प्रेमाचा पाऊस मन भरून जाते
विश्वासाने  जपावे आपले नाते

तू पाऊस होऊन बरसायची माझ्यावर
हिरवळ पसरली  प्रेमाच्या नात्यावर

माझे पाहिले प्रेम कसे विसरू क्षण 
फक्त तुझ्याच आठवणीत गुंतले मन

विरोध होता खूप  तरी झालेच मनातले
प्रीत बहरली सुंदर दृश्य दिसे नयनातले

पत्रात लिहायचो मी भावना गुंतलेली चारोळी
प्रेमासाठी प्रेमानं दिलेली अबोल ती आरोळी

प्रेम , पत्र आणि त्या पावसाच्या  सरी
ताटातूट झाली शेवटी पडलेली खोल दरी

प्रवास अन श्रावणातील  पावसाची भुरभुर
तुझ्या भेटीची आस मनाला लागलेली हुरहुर

____________________________________
४ डिसेंम्बर २०१६

©कवी:- धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण ,
जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

साथ तुझी मिळे मला

*___________ साथ तुझी मिळे मला__________*
__________________________________
��धनराज
                    कोमल  ��

अलगद झुलक  होऊन आलीस
माझ्या मनात शहारे खुलले
मैत्री प्रेमान झाली अशी
मन माझे तुझ्यात गुरफटले...
     
                  आठवुन क्षण मैत्रीचा
                  मन हळुवार हसले
                  बंध नात्याचे मनी
                  तोरण गुंफले...

गुंफलेले तोरण
वाढवेल शोभा प्रेमाची*
विश्वास पुरा
मजबूत धेंर्याची...

                  गुलाबाप्रत मैत्रीला जपणे
                  आहे तयारी मनाची
                  देवुन साथ एकमेका
                  करु वाटचाल सुखाची...

वाटेवर साथ फक्त तुझी
चांदण्या असतील  खूप
मनात माझ्या काजवे
हृदयात बसले तुझे रूप...

                  मनी नसे कोणी
                  मिळे तुझ्यासवे सुख
                  साथ तुझी मला मिळे
                  विसरुन जाई मी दुःख...

बसला रंग मनात
प्रेमाचा हा गुलाबी
तूच माझी राणी
हृदयात तुझी छबी...

                  ध्यानी मनी स्वप्नी
                  तुझेच नाव मुखी
                  सोबतीने जीवन
                  जगु आपण सुखी...
_______________________________________
३_डिसेम्बर_२०१६

रचनाकार 2

1©धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण ,
जि. औरंगाबाद.
                      2©कोमल पाखरे .
                       मु.पो. कलंब ,
                       ता. कळंब ,
                       जि .उस्मानाबाद .
_____________________________________

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

सायंकाळी

सायंकाळी उधळीत जाई नभात रंग ,
विरघळतो  जसा पाण्यात उठे तरंग .

सायंकाळी सुटे पक्षांची हि शाळा ,
मनमोहक क्षण सर्वांनाच लावी लळा .

सायंकाळी शांत तांबड्या रंगाची शोभा ,
किलबिलाट फार पक्षाचा खेळ चाले नभा .

झुळझुळ पाणी शांत नदी हा  किनारा ,
रंगात रंग भरे पक्षी घेऊनि चिमनचारा .

चमकती रवी किरणे,  सोनेरी पानांचा थाट ,
लगभग चाले वेळ , धरावी घरची एकच वाट .

थांबावे कुणी वेळ कि भरभर चालावे किती ,
मनाला लागलेली हुरहुर वेगळीच हि भीती .

कुणाला छान कुणाला वाटे भयानक ,
असा का येतो हा अंधार अचानक .

सायंकाळी बघुनी त्या पाखरांचे थवे
मन उडे फार वाटे कुणी सोबती हवे ,

________________________________
©कवी :- धनराज भुमरे पाटील ,
पाचोड, ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434







शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

फेसबुक वरील काही अनुभव ..


*फेसबुक वरील काही अनुभव*
__________________________________________

फेसबुक हे सर्वात लोकप्रिय social media ,
त्यापासून मी कसा दूर राहणार ?
फेसबुक वापरायचे फायदे खूप आहे ,
आणि त्याच बरोबर तोटे ही आहे .
काहीतरी आयुष्याचा निर्णय घेतात ,
इथपर्यंत वापर करणे योग्य आहे का ?
हे एक व्यसन म्हणून सुद्धा चर्चेत आहे
सर्वाना माहिती असेलच ?

मी जेव्हा फेसबुक वापरास सुरवात केली तेव्हा खूप अनोळखी मित्र भेटले , आपल्याच विचारासारखे असणारे आवडी निवडी जवळ जवळ सारख्याच ,
रोज बोलणे होत असायचे अगदी जवळची मैत्री झाली जशी .
हळू हळू मलाही फेसबुकचे वेड लागले ,
अगदी 5 मिनिट हि वेळ भेटला की मी त्यात गुंग होऊन जायचो .
कित्येक वेळी धोका देणार असतात मुद्दाम  जाळ्यात अडकवतात , मी नवीन असल्याने एक ग्रुप ने मला प्रेमाने जवळ केले आणि एक मुलीच्या प्रेमात पडायला नकळत प्रोसाहन दिले अन मी  त्या जाळ्यात अडकलो ,काही दिवसाने त्या मुलीने पैशाची मागणी केली.
मी आपला विचार करत राहिलो पण शेवटी तिच्या टाकलेल्या जाळ्यात अडकलोच ना ,
असो ती रुपये घेऊन गेली पण मित्र खूप गमावले .
पैशाला कधीच किंमत नसते किंमत असते ती मित्रांचीच चांगल्या विचारांची किंमत अनमोल खजिना असतो तो तुमचा .
आता मात्र मी एकटाच आहे समजून आले ना की जे झाले ते खूप लवकर होऊन गेले ,
प्रेम कधीही होते एकदाच होते असेही नाही ,
पण पहिले प्रेम मात्र कुणी विसरू शकत नाही .
मी दूर झालो हे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी योग्य होते , आता पुन्हा नव्याने सुरवात करायची
अवघड आहे पण तो भूतकाळ होता ,
वर्तमान हा समजदार आहे पुढच्या भविष्यासाठी .
चांगले विचार म्हणजे न संपणार खजिना लुटत राहा आणि आपलाही खजिना वाढत जाईल ,
ज्ञान वाटत राहा ,
या पासून दूर राहायचे ठरवले तर मी माझे फेसबुक पेज तयार केले व त्या वर काम करत राहिलो कित्तेक मित्र भेटले मला पेज वर काम करण्यासाठी आणि त्यांनी चांगले काम केले विचार शेअर करून पण हॅकिंग मुळे ते पेज बंद पडावे लागेल,
माझा id हॅक होतोय अस समजताच  मी पेज बंद करून id ची  काjळी घेण्यासाठी काही दिवस फेसबुक ला राम राम केला ,
Wapka . Com  वर नकली फेसबुक पेज तयार केले जायचे व तिथे युजर नेम व पासवर्ड टाकताच ती माहिती त्यांच्याकडे जायची  नकली असल्याने ते पेज ओपन न होता पुन्हा त्याजागी यायचे ,
काळजी घ्यावी नेहमी फेसबुक वापरताने  अशा अनेक साईट आहेत जे हॅकिंग करतात ,
फेसबुक ने यावर नियंत्रण ठेवले आहे तरी आपणही खबरदारी घ्यावी .

कुणाला बदनाम करण्यासाठी का इतर काही कारणासाठी फेक/नकली अकॉउंट कडून त्रास देण्याचेही प्रमाण खुप आहे  अशा अकॉउंट ला आपल्या लिस्ट मध्ये भरती  करायचंच नाही ,
कधीही अंगलट येऊ शकते ,
नकली अकॉउंट फार काळ नाही टिकणार पण कमी वेळेमध्ये ते त्यांचे काम करून घेतात  ते बंद पडले कि पुन्हा दुसरा तयार ,
काळजी ही आपण घ्यायला हवी .
आता फेसबुक वरही वाद होत असतात काही वाद तर
खूपच त्रास  दायक असतात हे फक्त फेक अकॉउंट मुळेच होते अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.

खास करून मुलींना जास्त टार्गेट केलेले असते .
 ओळख नसताने  संदेश  पाठवतात हे चुकीचे नाही ,
पण विनाकारण सन्देश पाठवतात ,
मुलींना त्रास देतात त्यांना नाही वेळ कुणाशी बोलायला ,
मग का सतावतात msg बघून रिप्लाय देत नाही वगैरे वगैरे बोलतात , एकदा नाही म्हणून सांगितले तर 
वारंवार संदेश पाठवून त्रास का देतात ?
या बाबत मुलींना खूप त्रास होतो
त्यांच्या तक्रारी खूप आहेत कारण त्रास देणारा एक नसतो  असे अनेकजण असतात त्यांनी काळजी घ्यावी ब्लॉक पर्याय असतो कुणी त्रास दिला कि सरळ ब्लॉक करून मोकळं होयचं .
तर मुलींना/महिला यांना विनंती आहे की ज्यांच्याशी ओळख असेल असेच मित्र लिस्ट मध्ये असू द्या ,
नवीन कुणी असेल तर पूर्ण माहिती तपासूनच निर्णय घ्यावा ,
2 वर्षापूर्वी मुलींचे स्वतः फोटो अपलोड करण्याचे  प्रमाण फारच कमी होते ,
आज बघा किती प्रमाण आहे फोटो  अपलोड  ?
मला याबद्दल  काही अडचण नाही पण
फोटो  अपलोड/शेअर करताने खास काळजी  घेतली पाहिजे  , 
फेसबुक वर शिकण्यासाठी भरपूर आहे ,
फेसबुक चा चांगला काळजी पूर्वक वापर केला पाहिजे

बाकी गमतीदार गोष्टी खूप आहेत फेसबुक वर मन शोक्त पणे आनंद घ्यावा कुणी जोक्स शेअर करतात तर कुणी स्वःत जोक बनतात  , असा
अनुभव बहुदा सर्वानाच आला  असेलच ,
_______________________________________

फेसबुक वर माझी छोटीसी कविता

*आभासी दुनिया*

असतात अनोळखी मित्रमैत्रिणी वाटतात ओळखीची
फेसबुक अनोखी आभासी दुनिया भारी मनोरंजनाची
.
आभासी  असलेतरी ती आपल्याशी जोडलेली आहे, वास्तव नसेल पण वास्तवातूनच निर्माण झाली आहे .

मनमोकळे होते इथे मन माझे वेडेपिसे होते कधी , शोधातो कुणाला अन मला हि शोधावे कुणी कधी .

येण्या-जाण्याची वेळ नाही ठरलेली कुणाची ,
तरी वाट पाहतच राहतात इथे परत येण्याची .

_________________________________________
२७/११/२०१६
*©धनराज भुमरे पाटील*
*मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .*
*मो:- 7218613434*

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

वादळ

निळं  पिवळं  हिरवं ,
समजून घ्या अर्थ .
जसा आपला भगवं ,
तसं त्यांचं नको भांडण व्यर्थ ....
___________________________
२२/११/२०१६
©कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

चारोळी

ना कळे रंग राखेचा ,
उबदार आसन वाटे चूल .
अल्लड भाव ओळखीचा ,
नवखे गोंडस आईचे मुल

©धनु ...

मनात लपलेला कवी

२०/११/२०१६

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

माझी मायभूमी

..............माझी मायभूमी..............
_______________________________

जन्मलो इथल्याच पवित्र पावन मातीत,
रांगलो इथल्याच सर्वगुण संपन्न मातीत .
नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी  मायभूमी .

माझ्या मायभूमीत थोर किती जन्मले ,
समाजासाठीच पूर्ण आयुष्य वाहिले .
मातीत जिरलेलं रक्त खळखळतं नदीत ,
शुरांना वीरमरण लाभले या मायभूमीत .

कष्टी बळीराजा इथल्या काळ्या मातीत राबतो ,
आभाळाची माया जेव्हा पाऊस होऊन बरसतो .
दुष्काळाची होती शिक्षा चटके बसण्यासाठी ,
नका तोडू निसर्गाचे नियम या मायभूमीसाठी .

माय लेकरांची किती अतूट गोड़ गुंफण ,
चांगल्या विचारांचे आपण घालूया कुंपण .
बलात्कारी, भ्रष्टाचाराचा कचरा हटवण्यासाठी ,
मजबूत होऊन लढूया या मायभूमीसाठी .

नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी  मायभूमी .....
___________________________________
२१/११/२०१६
©कवी :-  धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद
मो :- 7218613434