रविवार, २३ डिसेंबर, २०१८

पोरी तुझा प्रेमी....

पोरी तुझा प्रेमी रोपटे
सरी झेलून त्यास पाहू दे
अन मुळाशी प्रेमाचा झरा
सदैव तुझा वाहत राहू दे

पोरी तुझा प्रेमी लाजरा
तुझ्या हाती त्याचा कासरा
सतावू नकोस कधी त्या
अल्लड बिचाऱ्या वासरा

पोरी तुझा प्रेमी हळवा
बांधलाय नात्यात घट्ट
मिळावा तोच मजला
असा नकोस करू हट्ट

पोरी तुझा प्रेमी भित्रा
जपतो दोघांच्या नावाला
समजतंय प्रेम तुझं पण
काय सांगेल तो गावाला

©धनराज भुमरे पाटील
२४/१२/२०१८

बघत वाट सजनाची

बघत वाट सजनाची
माळली फुले कोरी
गारवा अंगचटीला येतो
बघताच पाठ गोरी

तुझीच रे मी सजनी
तुझ्याचसाठी फुलने
आतुरता भेटीची बघ
तुझ्याचसाठी हे  झुरने 

©धनराज भुमरे

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

तू चिमनी शहरातली

तू चिमणी शहरातली
मी चिमणा गावातला
अंतर वाटेना काही तरी
फरक कळतो नावातला

ये एकदा शांत गावाकडे
मनसोक्त गाऊ गाणे
गोंधळात शहराच्या प्रिये
कसे ऐकू येतील तराने

©धनराज भुमरे

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

निशब्द भावना समजून घे.( तिच्या मनातल्या भावना समजल्यानंतर)

गुंतागुंत जीवाची ही झाली अशी
हृदय अन जीवाची भेट झाली अशी

फुले उमलले डोळ्यात असे सजले
डोळ्यातील अश्रूही माझ्यावर हसले

बंधने तुझी अन माझी हिराच जणू
विस्फोट विक्राळ घडवतो छोटासा अणू

नजरेतले प्रेम समजले मला आज
डोळ्यात अश्रूंचा चढलाच साज

सर्व कोडे सुटले आता जरी
मोकळा श्वास नाही भेटला आता तरी

संकटे येणार नवीन दोघांच्या समोर
करावे लागेल कधी हृदय खु कठोर

साथ दोघांची कायम पुढे असेल का
पूर्वीप्रमाणे दुःखात हृदय असेल का

प्रेम जीवापाड करतोय सांगू कसे
निःशब्द भावना तूच समजून घे हवे तसे...

©धनराज भुमरे पाटील....

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

बाप माझा छत्रपती

बाप माझा छत्रपती
मातीसाठी तो झुंजला
राजा शिव छत्रपती
नाद सह्याद्री गुंजला

मनगट जोर धरी
नाम घेता तुझे देवा
विचारांचा अनमोल
दिला आम्हा असा ठेवा

भाव भक्तीचा सागर
हाती तेज तलवार
शौर्यवंत महाराजा
किर्ती रे अपरंपार

चंद्रा सुर्यासम देवा
तेज तुझं बहुमान
पाने फुले आसमंत
पक्षी गाती गुणगान

©धनराज भुमरे पाटील
१६/१२/२०१८

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

बाप शिव छत्रपती

जगी असा एकच तो
माझा राजा पराक्रमी
असा लढला शत्रूंशी
मुक्त केली मायभूमी

युक्ती लढण्याची खास
सगळेच तोडी पाश
रयतेचा पाठीराखा
करी शत्रूंचा तो नाश

थोर ती माता जिजाऊ
दिले संस्कार एकीचे
आशीर्वाद तो जमले
वीर मावळे नेकीचे

राजा सर्वाचा कैवारी
असे गीत गाते माती
आम्ही लेकरे त्याचीच
बाप शिव छत्रपती

©धनराज भुमरे पाटील
१५/१२/२०१८

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

पाऊलखुणा

मनातलं सांगावे कुणा कळेचना
जातीचा हा प्रश्न अवघडच जरा
अहो सोडवल्या जाईना म्हणून 
आता न समजून घेतलेलाच बरा

देण्यास उदाहरण एकतेचे तरी
अनेक रंगी मणी जोडावे लागेल
सुखावतील सर्व यासाठी इथे 
प्रत्येकाचे गुणगान गावे लागेल

समजावतो मनाला बस इतकेच
निसर्गासारखा माणूस असावा
कार्य आपले असे करत रहावे
परकेपणाचा भाव मनी नसावा

मिटवून पाऊलखुणा माझ्या या
पाठलाग करत इथपर्यंत यावे
मिटवत त्यांच्याही पाऊलखुणा
अन त्यांनीही माघे न फिरावे

©धनराज भुमरे पाटील
१४/१२/२०१८

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

चंद्रकला

__________________

तुझे रसाळ गोड बोलणे
वेड लावी या जीवाला
सुंदर खूप तू चंद्रकला
भुलवते तू कुणाकुणाला

अदा नखर्याची वेगवेगळी
नशा तुझ्या रंगात आहे
फुलासारखी तू मनमोहक
सुगंध तुझ्या अंगात आहे

हृदयाला स्पर्श करते तू थेट
हळुवार फिरवून नाजूक बोट
रसाळ किती मादक ओठ
घ्यावा त्याचा बस एकच घोट

मनमोकळे जगण्याची तू
जणू एक पाऊलवाट आहे
रखरखत्या उन्हात सखे
तू ग सावली घनदाट आहे
______________________
©धनराज भुमरे पाटील
२२/११/२०१८

शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

जुगलबंदी , अर्चना जाधव,गणेश भोसले, धनराज भुमरे

"आठवण तुझी- अर्चु. "या पेज वर २५/०९/२०१८ सायंकाळी झालेली जुगलबंदी ......

सहभाग:- Archana Jadhav, गणेश भोसले  व Dhanraj Bhumare Patil...

भरुन आले आभाळ,
पण बरसले नाही.
आठवण तर खुप येते तुझी,
पण तुला कधी कळले नाही.
शब्द्-अर्चु.

आठवतो आजही मला
तुझ्यासोबतचा प्रतेक क्षण.
असेच भरुन येता नभ
येते तुझी खुप आठवण..
©गणेश भोसले

त्या प्रत्येक क्षणांना मी,
हृद्यात साठवुन ठेवलय.
दाटुन आलेल्या नभाला ,
कोसळु नको मी म्हणलय.
शब्द्-अर्चु.

वाहत राहतात अश्रु
कोरडे पडले डोळे.
भरल्या आभाळाचे दुख
येथे कुणाला न कळे..
©गणेश भोसले

आठवण विरत आहे
उजाळा किती वेळा देऊ
रोजच लिहतो तुला मग
सांग कोणते पुरावे देऊ
©धनराज भुमरे

पुरावा नको काही ,
आहे पुर्ण विश्वास.
तुझ्यातच वाहत राहीन,
आहे जोवर श्वासात श्वास.
शब्द्-अर्चु.

असाच राहो विश्वास
टिकुन ठेवा नाती
कळावी या जना
जगण्याची महती.
©गणेश भोसले

भरल्या आभाळाचे दुःख
धरतीला छान कळते
पुन्हा भेटायच्या ओढीने
नव्याने पुन्हा बहरते
©धनराज भुमरे

भरल्या डोळ्यानी,
तुला मी पाहीन.
दाटल्या भावनासोबत,
तुझ्यात वाहीन.
शब्द्-अर्चु.

वाहने थांबणार नाही
काळजात सागर साचलेला
आठवतो शब्द आजही
तुझ्या डोळ्यात वाचलेला
©धनराज भुमरे

नव्याने होईल ,
भेट आपली.
शमेल तहान,
जरी धरती तापली.
शब्द्-अर्चु.

वाचलेल्या भावनांना,
हृद्यात साठवुन आहेस.
कधीतरी मुक्त हो,
अजुन किती झुरनार आहेस.
शब्द्-अर्चु.

बहरण्याचा हा खेळ
माझ्या फुलवतो मना.
ऊन पावसाचा मेळ
संदेश मिळतो या जना.
©गणेश भोसले

नको लागुन देऊ,
भनक तु जनास.
फरक नाही पडत इथे,
कोण ,कुठला कोणास.
शब्द्-अर्चु.

भेटीसाठी आतुर जरी
साजन मात्र रुसला आहे
वाट दाखवणारा रानावरचा
नकाशा तो पुसला आहे
©धनराज भुमरे

पुसला जरी नकाशा तु,
वाट मी शोधनार आहे.
कानोसा तुझा हृद्यात माझ्या,
सांग मला कोण अडवनार आहे.
शब्द्-अर्चु.

ऊन पावसाचा खेळ
बघतात येथे सर्व
कोसळले व्यासपीठ 
घाबरलेले आहे पर्व
©धनराज भुमरे

बहरण्याचे क्षण हे
फुलणारे मन सुगंधी  
तमा न कसली जीवाला
चढली श्वासास धुंदी
©धनराज भुमरे

ऊन ,पाऊस ,वादळ,
कोण मज न आडवी,
असेल धमक तर,
शक्कल आजमावी.
शब्द्-अर्चु.

बहरण्याचे क्षण ,
बहरतच राहनार.
प्रेम आहे तुझ्यावर ,
करतच राहनार.
शब्द्-अर्चु.

नकाशा पुसणारा मी नाही 
तू नव्याने बहरून येशील का
हीच वाट माझी जाणून घे
पुन्हा पुन्हा सामावून घेशील का
©धनराज भुमरे

मन वेडे आहे रे
सावरते कधी बावरते.
धावते कुठेही बेभान
कोन याला आवरते..
©गणेश भोसले

सामावुन घे तु कधी
काय मिळते प्रेम गमावुन
जगण्याचे खरे हित
काय आहे दुसरे याहुन.
©गणेश भोसले

आवरणारे एक मन असते
बावरणारे एक मन असते
धावणारे सगळे येथे जरी
भावणारे एक मन असते
©धनराज भुमरे

कुठे असते हे मन
बाहेर कि आत.
आजवर कुणी त्यावर
केली नाही मात.
©गणेश भोसले

काव्याच्या खेळात अशी
तु लपत नको जाऊ
शब्द धन मिळते इथे खुप
आपण सारे ते लुटून घेऊ.
©गणेश भोसले

मनास मारताना
मी , तिला पाहिले
मनाचे अश्रू ते
मनातच राहिले
©धनराज भूमरे

शब्द धन लुटलेले
सताड उघडेच ठेवू
घेतील सर्व आनंद
अश्या ठिकाणी नेऊ
©धनराज भुमरे

मन मारुन जगायला ,
मी आता शिकले आहे.
नको परत ती आस आता.
खरंच मी थकले आहे.
शब्द्-अर्चु

दुनिया बाजार आहे,
नको तेच घेते.
विनाकारन मंग ,
अपनासच दोष देते.
शब्द्-अर्चु.

हेच तर आहे
विश्वातले खरेखुरे दान.
वाचाव सर्वानी
द्याव हृद्यात स्थान.
©गणेश भोसले

आस मनी असतेच
मन ही बोलत असते
चालण्यास पुन्हा, क्षणभर
विसावा शोधत असते
©धनराज भुमरे

धन्यवाद...😊🙏🙏🙏

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

सोलले तोंड

सोलले तोंड अन लालबुंद झाले
झोंबणार नाही असे खाऊ काय
पांढरी पांढरी  ते फोडं सलणारे
वळवणाऱ्या जिभेला लागले पाय

फिरतच राही ती आतल्या आत
असेच मनाचे बहुदा होत असावे
गुटमळत राहते एकाच विषयात
काहीतरी त्यालाही सलत असावे
©धनराज भुमरे
१९/०९/२०१८

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

श्वास जहरीच होते...

वाटेवर काटेच होते
मी फुल समजून चालत हॊतो

जगणे पाळण्यात होते
उगाच पाळण्याबाहेर पाहत होतो

श्वास जहरीच होते
मी सुगंधित त्याला समजत होतो

©धनराज भुमरे
१८/०९/२०१८

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

तू असते जुठे

तू असते कुठे
सांग मला
मी पाहतो  वाट
कळेल का तुला

कधी  येते अन
न बोलतच निघून जाते
जाताना मात्र तू
पाऊल खुणा ठेवून जाते

त्या पाऊल खुणा
सांगून जातात
जशी तुझीच नजर
मला पाहतात

कसे कळेल तुला
तू बघते मला कळते
मग का ग असे तू
मला अबोल्याने छळते
©धनराज भुमरे
१७/०९/२०१८

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

शेतकरी पिकासारखा


पिकापेक्षा झाली बघा
गवताची जास्त दाटी 
किती काढत राहावी
शेतातली पालकाटी

शेतकरी  पिकासारखा
पीक झाले आता कमी
गवतानेच ओढून घेतली
मातीच्या पोटातली नमी

©धनराज भुमरे
१३/०९/२०१८

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

गीता पाटील यांच्यासाठी खास कविता ,

मंजुळ स्वर सुगंधी
महान तू कलावंत
छेडता राग संगीताचा
दुमदुमतो आसमंत

आठवण मनात कायम
नेहमीच का रडू पाहते
फुटू दे पालवी नवी
फुले उमलत राहते

नको कोंडूस मनाला
दुःखाला थोडं पळू दे
एकच मागणे देवाला
सांजवेळ ती ढळू दे

देठ तुटले फुल तू
मग का ग रडतेस
अंकुरित होते बीज
ये फुलून का अडतेस

©धनराज भुमरे पाटील
१४/०९/२०१८

आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ,
ही कविता खास तुमच्यासाठी  तुम्हाला आवडेल की नाही माहिती नाही ,
तुम्ही कलावंत आहात, या कलेला नेहमीच हसवत ठेवाल ना .... तुम्ही नेहमी आनंदात रहावे हीच प्रार्थना...🙏

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

चारोळी जुगलबंदी , गणेश भोसले-धनराज भूमरे

चारोळी जुगलबंदी
०१/०९/२०१८ ,११:२३ रात्री .
ते
०२/०९/२०१८ , १२:१८ पर्यंत

मन प्रेमात पडले
विरहात जरा रडले
शब्द आठवणींचे गुंफले
त्यात आसवे जडले
©धनराज भुमरे

अनेकदा इतरांचा
करतो आपण आदर.
पण भावणेची त्यांना
कधीच नसते कदर.
©गणेश भोसले

कधी कधी समजत नाही
भावना अशी का तशी
ही पाहू की ती  बाजू 
आपट्याची पाने जशी
©धनराज भुमरे

काय जगण्याला अर्थ
जिथे कुणी जपत नाही नातं.
जसं श्वासाशिवाय जगताना
अंतकरणात खोल दुखत जातं.
©गणेश भोसले

नाते श्वासाचे विश्वासाचे
मनास जिंवत  ठेवते
भावना दुखावली की
मरणाशी जाऊन ठेपते
©धनराज भुमरे

जितेपणी मरण असत
जेव्हा संपु लागतात नाती.
मरणाची भीती कशाला
नात्यांशिवाय जिवनची होते माती..
©गणेश भोसले

नात्याला जीव असतो
जीव जीवाचा तो असा
नाते अवनी अन मेघाचे
संपता दुष्काळ पडतो जसा
©धनराज भुमरे

जिव जिवाला खाते
मृत होतात नाते
तेच तर आपले जग आहे
एकट्याचे काय येथे
©गणेश भोसले

नाते पानासारखे गळून जातात
फुटते नवी पालवी जशी झाडांना
दिसते उमेद पावसात मनाला
प्रतीक्षा असते तशी झाडांना
©धनराज भुमरे

दिली सुखात सोबत
दुखाःत ते दुर गेले
हीच जगाची रित मला
लोकानीं दाखवुन दिले..
©गणेश भोसले

सोड सारे आता
थोडे काम पाहु
चिंता कशाला कुणाची
शांत झोप घेऊ
©गणेश भोसले

दुःखात एकांत हवा वाटतो
सोबत नसेल ऊर ही दाटतो
कळेचना मनाची अवस्था ही
ह्रदय जसा आतून फाटतो
©धनराज भुमरे

विचार नात्यांचा हा
खोलवर घेऊन जाईल
अनुभव शेवटी मिळतो
ओंजळीत ठेवून जाईल
©धनराज भुमरे

नसु दे सोबत कुणी
एकटा मी समर्थ आहे
लोकांच्या ओजंळीच पिवुन पाणी
जगण्याला काय अर्थ आहे....
©गणेश भोसले

झोप कसली येते मनाला
तो जागतच राहील हो
बंद करावे डोळे तरी ही
डोकावून पाहिल हो
©धनराज भुमरे

अनुभवच खरं तर
शिकवतो जगायला खुप काही.
इतराची सोबत राहील
याची खाञी देता येत नाही..
©गणेश भोसले

अनुभव आपला असतो
जो कुणी देऊन जाते
तुडलेले हृदय पुन्हा
नव्याने धडकू पाहते
©धनराज भुमरे

सोबत कुणाची हवी
मनाला आपल्या विचारा
घाव आपलेच देत असते
मुकेच सहन करतो बिचारा
©धनराज भुमरे

नव्यान जगायचं
दुख ते भोगायचं
हेच जिवन असेल आपले
तर का वेड्यापरी वागायचं
©गणेश भोसले

नको सोबत कुणाची
मी एकटाच बरा आहे.
थोडा का होईना मी
मनाने खरा आहे
©गणेश भोसले

वेड्यापरी वागण्यात
काही नसते हो चूक
तरी मनाला असते
थोडी मोठेपणाची भूक
©धनराज भुमरे

कसला आला मोठेपणा
लहान बनुन जगायचं
जमेल ते करायच अन
बाकी सारे त्यागायचं..
©गणेश भोसले

बोलते माझे मन  कानात
वेड्या वेड्यासारखाच रहा
दिसते सुंदर जग असेच
निर्मळ मनाने ,मन  भरून पहा
©धनराज भुमरे

रानातला श्रावण

रानातला श्रावण ....

वाजवत घंटी बैलगाडी चाले
वळणा वळणाची ही वाट
भरलेले रान , बाजूने कुपाट
खेळत्या थव्यांचे बघावे थाट

श्रावणात आता लागली हो
रानातली ओढ, कामाची घाई
चारायला घेऊन सोबत कुत्रा
बकऱ्या , म्हशी , अन गाई

सायकल, फटफटी , बैलगाडी
तर कुणी चालते पायी पायी
चप्पल तुटते चिखलात कधी
काट्यातून कसे चालायचं ग बाई

सालाने , महिन्याने, रोजाने 
कुणी असते कामास सवडीने
एकटेम दुपारी सुट्टीचा त्यात
सोबत भाकर खातात आवडीने

©धनराज भुमरे पाटील
०१/०९/२०१८
7218613434

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

सावली... भाग २


#सावली , भाग २

दिप्याने आप्पाच्या नजरेआड येऊन पिशीचं तोंड उघडलं त्यात २ पपया अन काही शेरण्या होत्या ,
दिप्यानी पिशवीच्या तोंडाला उज्या हातात पकडून इकडं तिकडं बघत झोपडीकडे निघाला ..

पासुन पुढे.......

शुभ्या जरा हळू चालत होता टाचेला काट्यामुळे रग लागत होती
आमल्या त्याच्याच धुंदीत हातातल्या काठी ने चालता चालता गवताची मुंडकी उडवत होता , तोंड ,ओठ चिकट झाली म्हणून  दोघेही पाण्याकडे निघाले , हे असे डामचे की वाटेणी कधी जात नव्हते ..मधूनच घुसायचे ,
वढा येयच्या आधी म्हसोबा लागायचा पिंपळाच्या मांडीवर आरामशीर बसलेला , तिथली झाडी, झुडपी अगदी दाट होती , भयाण दिसायचं सगळं .. नवीन पाहूणे, माणसं  तिकडे जायला टरकायचे ,
नंतर सुरू होते गायरान , त्या गायरानातून वढा होता , तो अर्ध्या गावाला वळसा घालून पुढे गेलेला ,
दिप्या तसा टरकायचा तिकडं जायला पण सोबती असलं की जायचा ,
हे दोघेही म्हासुबापाशी येऊन ,दिप्याची वाट पाहत काहीतरी उद्योग म्हणून झाडावर लटकलेल्या भोपळ्यावर नेम धरायला लागले ,
दिप्या एक दोन घर माघे टाकून म्हातारीच्या झोपडी पाशी आला झोपडी जरा मॉडर्न असल्यासारखी आप्पाची ची कला त्यात दिसून येत होती ,
म्हातारीला एकुलती एक मुलगी तिचा मुलगा गणाच्या चकरा असायच्या महिन्यातून एक दोन...
गावातली मंडळी ,शेजारी पाजरी , म्हातारीकडं लक्ष द्यायजी,काळजी घ्यायची त्यात आप्पा पहिल्या नंबरावर  ,
आप्पानी बांधलेली ती झोपडी दनगट होती.
मातीच्या भेंड्यानी बांधलेली झोपडी काय घरचं होतं ते,
ना वादळात डगमगायची , ना पावसाळ्यात गळायची .
म्हातारी लय काळजी घ्यायची शेण-सडा , पोतरा वगैरे....
दिप्याने झोपडीत पिशवी ठेवली अन बाहेर येऊन  जरासा ओरडला "आज्जे  पिशवी ठेवली बरं का "
झोपडी माघे आजी हलक्या हाताने नाटी आपटत होती,
तिने दिप्याला हाक मारली " दिपा त्यातली एक घरी नि "
दिप्या " नगं आज्जे राहू दि तुलाच मी अप्पाकडून घेऊन जाईल"
आजी उठून पुढं यायच्या आधी दिप्या फरार झाला ,
आजी पुन्हा गेली मग नाटी धुवायला ,
फाट्यावरून येणारा रस्ता म्हासुबा पर्यंत होता , याला बरेच फाटे फुटले होते सोईनुसार .
घरं संपली अन येणाऱ्या त्याच रस्त्याला पांदी म्हणायचे
पांदीतून दिप्या कधी चालत कधी पळत म्हसुबापर्यंत आला तिथं शुभ्या, आमल्या त्याची वाट पाहतच होते ,
शुभ्या घुबडाच्या डोळांनी पाहणारा आल्या आल्याचं वसकला "आली का भागूबाई भित्री "
आमल्या पण टवकरला आवाजाने " म्हातारीचं लाडकं वासरू आलं का"
दिप्या दम खात खात त्यांच्याकडं पाहत होता .
शुभ्या च्या तोंडाला ओघळ पाहून " थोबाड पुसायला काय होतं रे "
शुभ्या "मुसुम्ब्या खाल्ल्या रे आत्ताच"
आमल्या "तुला नाय भेटणार पळ"
दिप्या "तशी बी मला नाय आवडत ... आंबट मुसुम्बी"
शुभ्या नि मोसंबी खिश्यातून काढून सोलायला लागला,
येणार गंध दिप्याला खुणावत होता मोसंबी गोडच आहे.
आमल्या टकामका बघत असलेल्या दिप्याला पाहून "हाय  हाय गोडच हाय"
दिप्या "अर्धी तरी दि"
शुभ्या "आंबट आहे ना..."
नको नको म्हणत द्यायची होती ती दिली.

शुभ्या "चला आता निघू"
दिप्या " उद्या सर लय मारणार हाय, शाळाला दांडी मारली म्हणून "
आमल्या "तू वाचणार ...आम्ही खाऊत मार"
दिप्या "उद्या सांग काय सांगायचे तर मी मधी पडणार न्हाय "
शुभ्या "हा हा चल आता "
तिघे निघाले वढ्याकडं ,
गायरानात गाई,म्हशी चरत होत्या ,
मंडळी झाडाखाली  बसून लक्ष देत होती,
गायरानात काही फळझाडे पण होती , पाखरांमुळे उगवलेली ,
गायरानातून तिघे वढ्यापाशी आले ,
वढ्याच्या पाण्यात कवड्या चा घोळका खेळत होता बेशरमाच्या झाडाच्या सावलीत  ,
गवत तर अगदी मस्त हिरवेगार , काट्याची झुडपात पालापाचोळा गुतलेला होता,
जांभळाची चांगलीच 4/5 झाडं होती,
शुभ्या झाडावर चढून घोसची घोस खाली फेकली,
दिप्या अन आमल्या खायला तयार होती त्यांना दम थोडीच निघणार ...
शुभ्या काही खायचा अन खाली टाकायचा,
खाली उतरून तिघांनी आपापला वाटा घेतला,
शुभ्यानि आपला सरकार बेल्ट जरा पँटीला व्यवस्थित केला ,
झाडावरून उतरताना पॅन्ट जरा इकडं तिकडं झाली होती.
जरा जरा ऊन पडायला लागले सुटीच्या दिवशी गावातले पोरं इकडेच यायची खेळायला,
तिघेही त्या मोठ्या चिंचेकडे निघाले जिथं पोरं हमखास असायची, जरा वेळ खेळले आणि अंधार पडायचया आधी पुन्हा निघाले गावाकडे,
दिप्या आजी कडे गेला निरोप द्यायचा विसरून गेला होता,
तो सांगून पुन्हा घराकडे निघाला,.....

क्रमशः.....

©धनराज भुमरे पाटील

मैत्रीण

मैत्रीण...

प्रेमळ, गुणी, मनमोकळी
भेटली मला मैत्रीण छान,
ती कल्पनेत भिजवते अन मी
रंगवतो तिला विसरून भान...१

रंगात रंगने तिला आवडते
शब्दात ती अशी बहरते,
स्पर्श हा कोवळ्या पानांचा
रंग जणू सुंदर पंखात भरते...२

मनास जोडते असून दूर जरी
काव्य गुंफण शब्दांची भारी,
निखळ मैत्री आणि मनात
नाती सामावलेली सारी...३

मी पाखरू ! तिने घरटे व्हावे
मी वाटसरू ! तिने वाट व्हावे,
मैत्रीचं हे रोपटे झाड व्हावे
वाढावे, अन घनदाट व्हावे...

©धनराज भुमरे पाटील
7218613434
२८/०८/२०१८

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

मैत्रीण...

मैत्रीण...

प्रेमळ गुणी मनमोकळी
भेटली मला मैत्रीण छान
कल्पनेत भिजवते मज
रंगवतो तिला विसरून भान

रंगात रंगने तिला आवडते
शब्दात ती अशी  बहरते
स्पर्श हा कोवळ्या पानाचा
रंग सुंदर पंखात भरते

मनास जोडते असून दूर जरी
काव्य गुंफण शब्दांची भारी
मैत्री निखळ मैत्री असून
नाती सामावलेली  सारी

मी पाखरू तिने घरटे व्हावे
मी वाटसरू तिने वाट व्हावे
मैत्रीचं रोप हे झाड व्हावे
वाढावे अन घनदाट व्हावे

©धनराज भुमरे पाटील
7218613434
२८/०८/२०१८

गुंफण

तुझ्या बोलण्यात आहे
लौँग्या मिर्चीचा तडका
नजरेत आहे आग
मग उठू दे भडका

आहे निडर वाघीण 
तूच चपळ नागीण
वाट अडवली कुणी
सोडतेस तू कातीन

चंद्रासम शीतल तू
पाण्यासम नितळ तू
कायमच रहा तुझ्या
मतावर अटळ तू

हिरवळ रानात या
बोराटीची कुंपण
रक्षा करते  होऊन
शब्द दगडी गोफण

©धनराज भुमरे पाटील
२८/०८/२०१८

कवितेविना बेरंग सर्व काही

काम नाही तर कल्पना नाही
कल्पना नाही तर शब्द नाही
शब्द नाही तर कविता नाही
कवितेविना बेरंग सर्व काही
©धनु
१८/०८/२०१८

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

सावली

#सावली....

शुभ्या लिंबाच्या झाडाखाली बसून मोसंबी सोलतच होता की कुणीतरी येतंय कळताच त्याने पटकन 3 मुसुम्ब्या गवतात टाकल्या  ....
तिकडुन आमल्या येताना दिसला  अन पुन्हा वाकून गावतातली एक मोसंबी उचलून सोलायला घेतली. अंगठ्यावर जोर देत..."त्यो अजून आला न्हाय का"
दहा पावलावर आलेल्या  आमल्याचं उत्तर .. "त्यो गेला फाट्यावर म्हातारीच काम करायला, लैच लाडका त्यो म्हातारीचा , म्या सटकलो तिथून त्यो यईल मागून"
शुभ्याच्या जवळ येऊन , "मला दि आर्धी"
शुभ्यानी गावताकडे बोट दाखवत "दोन तीन हे, घे तिथून"
आणि फोडलेली मोसंबी खाऊ लागला.
आमल्यानी पण मोसंबी सोलायला सुरवात केली "म्हातारीचं पोरगं शहरातून येत महिन्याला अन दिप्या ला पण काहीना ना काही घेऊन येतं "
शुभ्यानी तोंडातला चोथा थुकून "हा जाऊदि, काटा काढ लय दुखायला "
आमल्या " कोणता खुडला रे"
शुभ्या "भाभळीचा, रामभाऊ च्या बागातुन आणल्या, येतानाच खुडला पांदीत "
आमल्या " बर बर काढतु थांब संपू तर दि आधी"
दोघांनीही मोसंबी खाऊन घेतली अन शुभ्या नी बुड ठेकवलं, उजा पाय उडघ्यावर घेतला .
आमल्यानी सदऱ्याची पिन काढली अन तो पण खाली बसला .
तोंडातला थूका उज्या हातानी शुभ्याच्या टाचीला लाऊन चोळू लागला , जरा भिजल्यावर काटा दिसावा म्हणून नखानी  खाजल्यासारखं करून दातात दाबलेली पिन घेऊन उकरू लागला ,
काटा खोलच रुतला होता .
शुभ्यानी डावा हात घोट्यावर तर दुसरा हात पोटरीवर घट्ट केला ,
आमल्या काटा काढायच्या धुंदीत होता , पिन आत टोचली तसा शुभ्या हुस्स करू लागला ,
काटा काढला रक्त निघालं ...
पण पाणी काही निघाले नाही डोळ्यातून .
आमल्यानी हात सदऱ्याला पुसला,
शुभ्या काटा खुडला होता तिथं दाबत होता ,रक्त येणे बंद होऊन त्याजागी पाण्यासारखं दिसायला लागलं .

इतक्या वेळात बाजूने झाडी असलेल्या  कच्च्या रस्त्याने चालत  दिप्या फाट्यावर पोहचला,
रस्ता जरा ओलाच होता सकाळी पाऊस पडून गेला 11 वाजले तरी सूर्य काही दिसला नव्हता , बैलगाडीच्या चाकाची निशाण ताजी दिसत होती ,
गावाकडून येणारा दिप्या डाव्या हाताला वळून वडाच्या सावलीत येऊन उभा राहिला वड चांगलाच मोठा होता,
वडा खाली लागूनच छोटीशी हॉटेल होती , एका बाजूला गुरांना पाण्यासाठी चांगलाच हौद होता त्यात पाणी एक दिवसाआड आप्पाच भरायचे ,
त्यांची ती हॉटेल मोक्यावर होती
आत  दोन बाकडे  होती, पाचेक माणसे बसतील अशी ,
बाहेर रांजण ठेवलेला त्यात प्यायचं पाणी
अन दुसरा रांजण आतमधी होता मागच्या कुडाच्या डाव्या कोपऱ्यात अन समोर लाकडी टेबल तीन बाजूने पोतं फाडून त्याला खालपर्यंत झाकून घेतलेलं, टेबलावर रॉकेलचा स्टोव ,
आप्पानी गावातल्या पोरांना हाताशी धरून हॉटेल च्या पुढं  वडाच्या खोडाभोवती दगडं रचून उंचीला दोन अडिच फूटाचा गोल  वटा तयार करून घेतला होता वट्याला मातीची भरती होती ,
रोज सकाळी हॉटेल समोर सडा टाकताना त्या वट्यावर पण टाकायचा हा आप्पाचा नित्य नेम,
दिप्याने नजर फिरवली आत कुणी नव्हते ,
बांदावर बैलं  सडक लावून दिलेली होती , गळ्यातल्या घंट्याचा आवाज येत होता , एक गाय पण होती तिच्या घंटीचा आवाज कमीच येत होता , 
जरा बाजूला येऊन मोठ्याने आवाज दिला, " आप्पा "
आप्पा हॉटेलच्या माघे त्यांच्या  शेतात  बाजरीतले  उपटगवत काढत होते याने बैलाला संध्याकाळची वैरण ही व्ह्यायची अन रान ही जरा रिकामं व्ह्यायच , त्यांनी दिप्याचा आवाज ओळखुन बाजरीतून आवाज दिला ,
" काय रे थांब आलोच "
दिप्या "आज्जीने पाठवले "
इतकं बोलून तो वट्यावर बसला , वटाही थोडा ओलाच होता.
पाखरांचा आवाज कानावर पडत होता तसा तो टकामका वर पाहत होता ,
थोड्या वेळात आप्पा आले,  अंगातली बन्यान घामानं ओली झालेली , हौदातल्या पाण्याने हात धुतला अन ओला हाताने चेहऱ्यावर फिरवत " बाकीचे न्हाय का आले , कुठं हिंडायला गेलीत "
दिप्या नी पटकन उत्तर दिले "ओढ्याकडे गेलीत मला पण तिकडेच जायचे आहे ",
आप्पानी माघे माघे यायचा इशारा केला अन ते हॉटेलात जाऊन ,
टेबलाखालून पिशवी काढून दिप्याच्या दिशेने धरली , " पाडू बिडू नको "
दिप्या " नाही आप्पा नेतो जशी दिली तशीच "
आप्पा " म्हातारीला सांग गनुदा या हप्त्यात येईल "
दिप्याला घाई झालेली तो गरबड करत " सांगतो सांगतो , येतो आता "
दिप्याने आप्पाच्या नजरेआड येऊन पिशीचं तोंड उघडलं त्यात २ पपया अन काही शेरण्या होत्या ,
दिप्यानी पिशवीच्या तोंडाला उज्या हातात पकडून इकडं तिकडं बघत झोपडीकडे निघाला ..

क्रमशः....

©धनराज भुमरे पाटील
२५/०८/२०१८