वास्तवाशी असणारे सूत्र माझे बिघडले होते
स्वप्नात तिचे येणे भलतेच महाग पडले होते
ती येत होती पूर्वी रोजच स्वप्नात माझ्या
बसलेली असायची कायम मनात माझ्या
मात्र आता तिचे स्वप्नात येणे बंद झाले
म्हणून आता माझे बाहेर जाणे बंद झाले
कायमची विसावली ती ह्रदयात माझ्या
विसर पडला तर येईल स्वप्नात माझ्या
एकरूपता नजरेतून आता पाहतो आहे
अस्तित्व तिच्यामुळेच मी जाणतो आहे
मनी समतोल राखून मी चालतो आहे
ती फुल मी सुगंध होऊन वाहतो आहे
©धनराज भुमरे