अहो खूप वारा सुटलाय सु सु करतोय
अन त्यात ह्यो जवळच असलेल्या पिंपळाच्या पानाचा सळसळाट ,
ऊन जरा चांगलेच पडले हो ,
आजू बाजूची हिरवळ तर मनात भरते
पाखरांचा कल्लोळही कानावर येतो जेव्हा हा वारा जरासा शांत होतो,
पुन्हा जोर धरतो थांबून थांबून लेकरागत रडतो ,
मला जराशी भूक लागली हो ,
उन्हाळ्यात जास्त काम नसते हो मला पडून असतो नुसता... तापून तापून होतो पून्हा सज्ज...
आता खूप मुळे आहेत लपेटून करतात माझ्याकडून काहीतरी मिळण्याची आशा ,
खूप हळहळ वाटते ,
महिनाभरापासून पावसाचा थेंबही अंगावर पडला नाही ,
मी तरी काय देऊ त्यांना ,
कसं समजावू त्याना.. हा कोरडा जीव कुणाचाही नसतो.
मलाही ठेवतील नाव त्या दगडा सारखं ,
व्हावं लागेल मला ओला , तेव्हाच पाझर फुलेल मला .
माझ्यात ती ताकद नाही अश्रू ढाळण्याची .
तर तेही केले असते त्या माऊली सारखा जीव जाळून जाळून जगवलं असत तुम्हाला ,
हळू हळू तुमची पाने सुकतील , खोडात असलेला ओलावाही सोसला जाईल जीव आकासला जातो ,
आशा असते ना तुमच्याही मनात येईल पाऊस आणि फुलेल नवी पालवी , सुकलेला पाला-पाचोळा जेव्हा अंगावर पडतो ना ...
जाणवतं तू ही काळजी घेतो माझा ओलावा ठिकवतो , स्वतःला तोडून माझ्यावर टाकलेली चादर मायेची उबदार कुशीसारखीच आहे ,
बरेच दिवस जातील... पाऊस काही येणार नाही असंच वाटतं ,
मग होईल हाड वाळल्यागत चामडी चिकटलेली , उपटले जातील नवीन रोपांसाठी , अन मुळाशी मी लटकला जातो अन फेकलं जातं बांदावर ,
इथंच राहणार... राहणार कुजनार आणि सडणार आणि मलाच वेचावा लागतो हा कस तुमच्या गुणांचा ,
पडला पाऊस तर घेऊन जाईल नव्या पडलेल्या बियांसाठी त्यांनातरी पोटभर मिळावं .
उन्हात तापून तापून घ्यावं लागतं तेव्हा कुठं माझ्यातले अवगुण हवेत विरून जातात ,
पहिल्या पावसाच्या सरी उंगावर पडतात ना इतका आनंदी होतो,
सुगंधात दरवळू लागतो ,
त्या कवीच्या ओळी कानावर पडतात
आनंद आनंदी गडे
हिरवे इकडे तिकडे चोहीकडे
हो मी खरंच खूप आनंदी होतो ,
प्रेमरसात भिजून वाहू लागतो.. या उंची कडून पायथ्याशी , भरतो ती राहिलेली जागा , घेतो बीज कुशीत ,
तेही प्रेम करतात माझ्यावर... घट्ट बिलगतात भोवती ,
रोपाची झुडपं , झुडपाची झाडं होताना कधी विसरत नाही ते ,
पानावर पडणारा प्रत्येक थेंब चुंबन घेऊन टाकतात .
त्या थेंबतलं ते प्रेम अजून प्रेमळ होत जातं ,
आणि वेळो वेळी तोडून स्वतःला टाकतात अंगावर ती उबदार चादर , प्रेमाचा ओलावा टिकवणे हे त्यांच्या कडून शिकावं लागेल .
मी ढेकूळ ....ओळखता ना मला ...
©धनराज भुमरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा