बुधवार, १० जानेवारी, २०१८

मैत्री

अचानक झाली भेट सोबत असताना
खूप छान वाटले गालात हसताना

मैत्रीची सुरवात तुम्ही केली खास
मातीस सरीची गरज असताना

दोन शब्द खूप झाले माझ्यासाठी
आनंद वेचला तो हृदयात वसताना

मनामध्ये बोलायचे खूप असते
समजून घेताल ना शब्द अडताना

शब्दात साठवले क्षण कसे विरतील
आठवेल पुन्हा माघे वळून बघताना

--------------------------
@धनराज भुमरे 
09-01-2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा