गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

प्रेम मरत नाही

प्रेम  मरत नाही
______________________________
फिरतात सारे एकही कुणा गठत नाही
चांगली अशी प्रेयसी त्यांना पटत नाही

दूर शहरातून कोणते वारे गावी आले
संस्कृती की आनंद हेच कळत नाही

प्रेम करतात खोटे काही दिवस आता
काहींचे पावले पुन्हा कधी वळत नाही

अबोल असतात काहींच्या भावना
मनात वादळे तरी सैरभैर पळत नाही

एकतर्फी निस्वार्थ प्रेम खरे असावे
शरीर जाळले तरी प्रेम मरत नाही

प्रेयसीचे सौदर्य कविता ने सांगतो
सजवलेले रूप तीचे कधी ढळत नाही

होतात गैरसमज दोघात सांगावे कुणी
माझेच खरे वाटे दुसर्यांचे जमत नाही 
______________________________
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
९फेब्रुवारी २०१७
7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा