तुला भेटायला आलो खूप दूर तू राहतेस
भेटीची ओढ दोघांना ही लागलेली झालो होतो आतुर
असच एकदा मनात आले
बसलो गाडी चालू केली
आणि निघालो तुझ्याकडे
तुझे लग्न होते
वेळेवर पोहचायला हवे होते ना
वेग वाढवला पण काय फायदा
गाडीच पंचर झाली ग
तरीपण चालवली गॅरेज शोधले
दुरुस्त केली गाडी आणि निघालो
किती दूर दूर राहतेस तू
3 तास लागले मला एकूण
मग गिफ्ट काय घेऊ समजेना
मित्राला सोबत आणले असते तर
सुचले असते ना
पण लग्न तुझं मी तरी काय करणार
माझी होती तू आज दुसर्याची होणार कस जमेल तुझ्या हात
दुसऱ्या हातात पाहून
सावरू शकेल का स्वतःला
नाही ग मी कोलमंडतोय
हरतोय इथे
जगतोय फक्त
तुझ्यासाठी
आलो दूर तुझ्यासाठी
तुझाच लग्न बघायला
तू शपथ घातली
अन यावे लागले
नको नको म्हणत होतो मी
शेवटी शेवटचे बघायचे ठरवले
आणि तेच शेवटचे क्षण
आजही मनात जिवंत आहे
समोर आहे
तुझा तो हसरा चेहरा
अन डोळ्यात पाणी
पहिले मी तुला दिसले का
तुझ्या डोळ्यातले लपवले
माझे मी लपवत होतो
कस समजेल तुला
आजही तुझ्या फोन ची वाट
पाहतो झाडाखाली बसून
तीच वेळ
तेच झाड
तीच आठवण
आजही तू माझी आहे
आणि माझं हृदय तुझ्याकडेच आहे
माझे कुठे ठेवले तू हृदय
नाही माहिती
तुलाही आठवण येत असेल
आणि येणारच
तूच प्रेम दिले मला
तूच सावरले मला
आणि तूच सोडून गेली मला
तूच समजावले मला
तूच आहे ती
जिने मला पुढचे जीवन जगायला सांगितले
तूच आहेस ग आजही
तू तू आणि फक्त तूच
मनात हृदयात
स्वप्नात डोळ्यात
फक्त तुच
झाकलेल्या डोळ्यात
उघड्या पापण्यात
ओले अश्रू ही फक्त तू
शेवटी राहिली फक्त तू
मी कुठे हरवलो
मी नाही राहिलो तुझा तो पूर्वीचा धनु
तूच बदलून टाकले मला
विरहात लिहायला लावले मला
प्रेमात असताना आठवणी दिल्या
आता रेखाटतो आहे एक एक करून
पुन्हा पुन्हा लिहतोय
लिहतोय फक्त लिहतोय
कुणाल दाखवत नाही
कुणाला सांगू मी
लिहलेले फक्त तुझ्यासाठी
तू कुठं आहेस आता बघायला
कुणासाठ हसू मी
तू केलीस सुरवात नव्याने
मी काय करू सांग जरा
विचारतोय तुझ्या आठवणींना
सोबत असेल तर सांग कुणी
तुझ्या सारखीच पाहिजे
तू का नको मला
तुझ्या पेक्षा चांगल्या असेल ग
पण तू मनातून जात नाही ना
किती लिहू
किती सांगू
कोण ऐकणार माझे
तू ऐकायची रागवायची
बस कर नाटके म्हणायची
मला मारायची तू
किती किती ते प्रेम
आणि किती आता दुःख
आयुष्य कमी पडेल
क्षणो क्षणी वाढत जात आहे
शब्दन शब्द तुझ्या आठवणीतून
येतोय पुन्हा नव्याने
अजून घाव बसतोयच आहे
थांबतो आता खुप आहे आजून
त्रास होतोय मला
तुझाच मी
पण तो भूतकाळ माझा
सोबत असतो माझ्या
मला सावरायला
मला वाट दाखवायला
पुन्हा जगायला लावणारा
वाट पाहायला
अजून बसून ठेवले मला
कुणाची वाट बघत
तसाच एकटा मी
आणि दूर ती माझी स्वप्ने
कधी जवळ येतात मृगजळ बनून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा