बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

शेती आणि शेतकरी


शेतकरी
____________________

कसदार  माती  काळी
मिळते  ढगांची माया
राबून  तो  पीकवतो
रानी झिजवून काया

उभे  पीक  बहरते
घरी येते थोडे धान्य ?
दुष्काळ  येताच  हाल
कडू सत्य आहे मान्य ?

गाय  माता, बैलांना
बाप आपले मानतो
मुक्या जीवाचे बोल
दुःख मनाचे जाणतो

पोशिंदा जगाचा तरी
गरिबी  सोडेना  पाठ
दुःखाच्या रेषा दारी
सुखाची सैल ती गाठ

बैला  संगे  करे  काम
शेती त्याचे चारी धाम
कष्टाचा  अमुल्य घाम
घेतो  मुखी  हरी  नाम

पीक नाही पानी नाही
दुष्काळी वार झेलतो
पुन्हा सुरवात होता
ओझे कर्जाचे पेलतो

जगी  एक  सर्वश्रेष्ठ
माय  लेकरांचे  नाते
भरवते  घास  बाळा
पक्षीही  सुरात गाते

साथ मिळो पावसाची
हिरवी  राने  असावी
गुरे  आनंदी  गोकुळी
पाना-फुलात  हसावी
_____________________
©धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड ता. पैठण ,
जि.औरंगाबाद .
मो :- 7218613434





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा