रविवार, ४ डिसेंबर, २०१६

प्रेमरुपी पाऊस

   प्रेमरुपी पाऊस

________________________________

प्रेम म्हटले कि मला आधी प्रश्न पडला
अर्थ प्रेमाचा समजून मनात अडकला

प्रेम हे सर्वाना न समजणारे एक कोडे
मिळते ना मिळते कधी जास्त कधी थोडे

प्रेमाला जिंकता येते प्रेमाने फक्त
खरे असूनही भीती होण्यास व्यक्त

दिसते प्रेमात असताना प्रेम सर्वत्र
दोन जीव मनाने होतात जेव्हा एकत्र

पाऊस होऊन येतो तर कधी वारे
चिंब भिजून जातात वादळात सारे

भेभान झालो मी जेव्हा तू दिसली
बघतच राहिलो पावसात तु भिजली

प्रेमाने चिंब लाली गालावर सजली
मन शहारून गेले लाजून तू हसली

प्रेमाचा पाऊस मन भरून जाते
विश्वासाने  जपावे आपले नाते

तू पाऊस होऊन बरसायची माझ्यावर
हिरवळ पसरली  प्रेमाच्या नात्यावर

माझे पाहिले प्रेम कसे विसरू क्षण 
फक्त तुझ्याच आठवणीत गुंतले मन

विरोध होता खूप  तरी झालेच मनातले
प्रीत बहरली सुंदर दृश्य दिसे नयनातले

पत्रात लिहायचो मी भावना गुंतलेली चारोळी
प्रेमासाठी प्रेमानं दिलेली अबोल ती आरोळी

प्रेम , पत्र आणि त्या पावसाच्या  सरी
ताटातूट झाली शेवटी पडलेली खोल दरी

प्रवास अन श्रावणातील  पावसाची भुरभुर
तुझ्या भेटीची आस मनाला लागलेली हुरहुर

____________________________________
४ डिसेंम्बर २०१६

©कवी:- धनराज भुमरे पाटील .
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण ,
जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा