सोमवार, २८ जानेवारी, २०१९

मोहरलेली कविता तू ....


सुंदर तू प्रेमळ तू प्रकाशमय ज्योती तू
क्षितिज तू जवळ तू सुगंधित माती तू

अल्लड तू चांदणी तू खुलते रातराणी तू
फुल तू दरवळ तू खळखळणारी वाणी तू

हसते तू रुसते तू दुःखानाही अडवते तू
क्षण तू चाहूल तू देऊन भूल फसवते तू

निराळी तू लाजरी तू निर्भयतेने जगते तू
निरागस तू भोळी तू प्रेमळ नजरेने बघते तू

मैत्रीण तू सोबती तू मोहरलेली कविता तू
गारवा तू ऊब तू चिंब भिजवणारी सरिता तू

©धनराज भुमरे पाटील
२१/०१/२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा