स्वप्नातील नववर्ष
अनमोल ठेवा या काळ्या मातीचा
पुढल्या पिढीसाठी भरपूर असावा
मातीला भेटण्यासाठी या पावसाला
हिरव्या झाडांचा सुंदर मार्ग करावा
धरणी मातेची पूजा करणारे दिसावे
शेतकरी माझा राना-रानात हसावा
नसे जवानांना घटकाभर विसावा
त्यांच्या बलिदानाचा विसर न पडावा
विसरून सर्व जाती पाती आता
निसर्ग माणसाच्या मनात भरावा
माणसाने आपले जाणावे कर्म
सत्याचा तो दिवा हातात धरावा
स्वप्नातल्या नववर्षी येतील जे दुःख
तेव्हा मना तू शुरासारखा लढावा
गुंजतील नाद त्यांचे चहूकडे असा
इतिहास कार्याचा इतुकाच घडावा
©धनराज भास्कर भुमरे पाटील
मु.पो. पाचोड, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
५ जानेवारी २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा