सोमवार, २ जानेवारी, २०१७

चल रे गड्या (बालकविता)

चल रे गड्या
__________________________

सकाळ झाली घंटी वाजली
प्रार्थना आणि राष्टगीत गाऊ
सुविचार ऐकू बसून शिस्तीत
चल रे गड्या शाळेत जाऊ

उशिर होईल गड्या आता
चल वेळ जास्ती नको  लावू
छडी ची वाटते भीती मला
चल रे गड्या वेळवर जावू

हसू खेळू नवे धडे शिकू
शिकवले ते पाटीवर गिरवू
उगवत्या सूर्याचे चित्र रंगवू
चल रे गड्या अंधाराला मिटवू

अंगणी खेळू दमून जाऊ सगळे
छोटा भीम अन शक्तिमान पाहू
सुंदर विचार , छान मैत्री बघून
चल रे गड्या आपण एकत्र राहू

छोट्या छोट्या हातांनी 
मोठे स्वप्न पूर्ण करू
आई-बाबा करेल कौतुक
चल रे गड्या सुसंगत धरू

भारत मातेचे शूर सैनिक
लढताना सीमेवर जीव देऊ
शत्रूंना संपवून पराक्रम करू
चल रे गड्या स्वराज्याची शपथ घेऊ
__________________________________

२ जानेवारी २०१७
©धनराज भास्करराव भुमरे पाटील .
(अबोल भावना-धनु)
मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो. 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा