शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

भटकंती (चित्रकाव्य)

भटकंती (चित्रकाव्य)
_____________________
भटकंती चाले फार 
कशी मिटेल तहान
दूर वाट झाली ती 
पडली पावले लहान

कळेल का दुःख कुणा
अंगावर कपडा धड नाही
चिमुकले लेकरे वाहतात
भार त्यांना  जड नाही

हिंडून रानोरानी खूप
तुटली वाहने पायातली
मिळाले ना पाणी सहज
संपली शक्ती कायेतली

चटके बसतात अंगाला
अन कोरडाच तो घसा
कुठे मिळेना सावली
हिरव्या झाडांचा वसा

बनवल्या सडका काळ्या
टाकले तोडून हिरवे वन
खरी प्रगती झाली कुणाची
भ्रष्टाचाराने तुटलेच मन
_____________________
२९ जानेवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा