माफ कर मला
झाली चूक मोठी माझ्याकडून
समजून आले त्रास खूप झाला
तुला आणि मलाही
का मी असे वागलो तुझ्यासोबत
का आपली मैत्री छान
आ
वाटले मला तू समजून घेशील
पण नाही तो तर
मनाचा भास असेल
वाटले तू तरी समजून घेशील
रडत होतो तुला कसे कळणार ,
तू दूर राहते
मी गोंधळलो होतोच
त्यात तू मला दिसली
मनातले बाहेर आले
अन मोठी चूक झाली
चूक मोठी जरी
त्याहून मन तुझे मोठे
वेडा म्हणत होती
आता खरच आहे तुझे
भरकटलो मी चूक झाली
मी तो नाही राहिलो
समोर नाही तरी
मनात विचार फक्त तुझे
प्रेमाचे नाही मैत्रीचे आहे
रूप नाही बघितले तुझं
सुंदर विचार आवडले
तुझी माझी मैत्री
झाली होती छान
त्या मैत्रीत दंग मी
मी कोण हेच विसरलो
चूक झाली माझी
इथेच चूक झाली
तू सुंदर खूप मनाने मोठी
या वेड्या सोब मैत्री केली
स्वार्थी आहे मी
तुला समजलेच असेल
मला माझी सफाई नाही द्यायची
मी जसा आहे तसा आहे
चूक झाली मला मान्य आहे
मनाचा मोठेपणा मिरवत होतो
तिच्या शब्दाने माझी जागा कळली
तिने न बोलताच सर्व सांगून गेली
मूर्ख मी तिला दुखावले
मैत्रीचे भास सोडले
चूक झाली माझी
माफ कर मला
पहिल्या प्रेमाची आठवण
मला आज सतावून गेली
त्या आठवणीत झाले
मैत्राचे नाते विरळ
चूक झाली माझी
सांगत नाही तुझे नाव
काबुल मला मी चुकलो आहे
या प्रेमळ मैत्रीला मुकलो आहे
तू येशील पुन्हा
मनाला चुकीची जखम आहे
तू करशील मैत्री पुन्हा
पण मी
माझ्या हातून झाला गुन्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा