चित्रकाव्य
संस्कारी अवखळ परी
______________________
अल्लड अशी गोंधळली
प्रार्थना कुणाकडे करते
कुणाची जाणीव कसली
एकटीच तू मग्न असते
स्वतःच्याच रंगात रंगते
जगू पाहते दुर्लक्ष करते
जिद्द शिकण्याची खरी
मग का मनी भीती धरते
ऐटीत उभी प्रार्थनेला
नियम चोख पाळते
सोबत शिदोरी असता
तरी भुकेला जाळते
गारवा हा अंगी भिनतो
चिमुकले हात घट्ट धरी
ओढ शिक्षणाची फार ते
न थांबता आत्मसात करी
सवंगड्यात एकटी पडे
वेगळीच भासते खरी
गोड़ गुणी बावरलेली
संस्कारी अवखळ परी
______________________
६ फेब्रुवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा