बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

प्रेम कुणावर करावे

प्रेम कुणावर करावे

साठवले काळेधन अमाप हे त्यांना कुणी सांगावे
जगतो तिथल्या पवित्र पावन मातीवर प्रेम करावे

भुलतात तनाच्या सौन्दर्यावर त्यांना कुणी सांगावे
नसे सुंदर कोकिळा, त्या मधुर वाणीवर प्रेम करावे

मोहापायी नीती विसरतात त्यांना कुणी सांगावे
सुगंध वेचणार्या मधमाशांच्या एकीवर प्रेम करावे

स्वार्थसाठी तोडतात वने त्यांना कुणी सांगावे
वादळ वारे झेलून उभा त्या झाडावर प्रेम करावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा