रविवार, २ सप्टेंबर, २०१८

चारोळी जुगलबंदी , गणेश भोसले-धनराज भूमरे

चारोळी जुगलबंदी
०१/०९/२०१८ ,११:२३ रात्री .
ते
०२/०९/२०१८ , १२:१८ पर्यंत

मन प्रेमात पडले
विरहात जरा रडले
शब्द आठवणींचे गुंफले
त्यात आसवे जडले
©धनराज भुमरे

अनेकदा इतरांचा
करतो आपण आदर.
पण भावणेची त्यांना
कधीच नसते कदर.
©गणेश भोसले

कधी कधी समजत नाही
भावना अशी का तशी
ही पाहू की ती  बाजू 
आपट्याची पाने जशी
©धनराज भुमरे

काय जगण्याला अर्थ
जिथे कुणी जपत नाही नातं.
जसं श्वासाशिवाय जगताना
अंतकरणात खोल दुखत जातं.
©गणेश भोसले

नाते श्वासाचे विश्वासाचे
मनास जिंवत  ठेवते
भावना दुखावली की
मरणाशी जाऊन ठेपते
©धनराज भुमरे

जितेपणी मरण असत
जेव्हा संपु लागतात नाती.
मरणाची भीती कशाला
नात्यांशिवाय जिवनची होते माती..
©गणेश भोसले

नात्याला जीव असतो
जीव जीवाचा तो असा
नाते अवनी अन मेघाचे
संपता दुष्काळ पडतो जसा
©धनराज भुमरे

जिव जिवाला खाते
मृत होतात नाते
तेच तर आपले जग आहे
एकट्याचे काय येथे
©गणेश भोसले

नाते पानासारखे गळून जातात
फुटते नवी पालवी जशी झाडांना
दिसते उमेद पावसात मनाला
प्रतीक्षा असते तशी झाडांना
©धनराज भुमरे

दिली सुखात सोबत
दुखाःत ते दुर गेले
हीच जगाची रित मला
लोकानीं दाखवुन दिले..
©गणेश भोसले

सोड सारे आता
थोडे काम पाहु
चिंता कशाला कुणाची
शांत झोप घेऊ
©गणेश भोसले

दुःखात एकांत हवा वाटतो
सोबत नसेल ऊर ही दाटतो
कळेचना मनाची अवस्था ही
ह्रदय जसा आतून फाटतो
©धनराज भुमरे

विचार नात्यांचा हा
खोलवर घेऊन जाईल
अनुभव शेवटी मिळतो
ओंजळीत ठेवून जाईल
©धनराज भुमरे

नसु दे सोबत कुणी
एकटा मी समर्थ आहे
लोकांच्या ओजंळीच पिवुन पाणी
जगण्याला काय अर्थ आहे....
©गणेश भोसले

झोप कसली येते मनाला
तो जागतच राहील हो
बंद करावे डोळे तरी ही
डोकावून पाहिल हो
©धनराज भुमरे

अनुभवच खरं तर
शिकवतो जगायला खुप काही.
इतराची सोबत राहील
याची खाञी देता येत नाही..
©गणेश भोसले

अनुभव आपला असतो
जो कुणी देऊन जाते
तुडलेले हृदय पुन्हा
नव्याने धडकू पाहते
©धनराज भुमरे

सोबत कुणाची हवी
मनाला आपल्या विचारा
घाव आपलेच देत असते
मुकेच सहन करतो बिचारा
©धनराज भुमरे

नव्यान जगायचं
दुख ते भोगायचं
हेच जिवन असेल आपले
तर का वेड्यापरी वागायचं
©गणेश भोसले

नको सोबत कुणाची
मी एकटाच बरा आहे.
थोडा का होईना मी
मनाने खरा आहे
©गणेश भोसले

वेड्यापरी वागण्यात
काही नसते हो चूक
तरी मनाला असते
थोडी मोठेपणाची भूक
©धनराज भुमरे

कसला आला मोठेपणा
लहान बनुन जगायचं
जमेल ते करायच अन
बाकी सारे त्यागायचं..
©गणेश भोसले

बोलते माझे मन  कानात
वेड्या वेड्यासारखाच रहा
दिसते सुंदर जग असेच
निर्मळ मनाने ,मन  भरून पहा
©धनराज भुमरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा