शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

जुगलबंदी , अर्चना जाधव,गणेश भोसले, धनराज भुमरे

"आठवण तुझी- अर्चु. "या पेज वर २५/०९/२०१८ सायंकाळी झालेली जुगलबंदी ......

सहभाग:- Archana Jadhav, गणेश भोसले  व Dhanraj Bhumare Patil...

भरुन आले आभाळ,
पण बरसले नाही.
आठवण तर खुप येते तुझी,
पण तुला कधी कळले नाही.
शब्द्-अर्चु.

आठवतो आजही मला
तुझ्यासोबतचा प्रतेक क्षण.
असेच भरुन येता नभ
येते तुझी खुप आठवण..
©गणेश भोसले

त्या प्रत्येक क्षणांना मी,
हृद्यात साठवुन ठेवलय.
दाटुन आलेल्या नभाला ,
कोसळु नको मी म्हणलय.
शब्द्-अर्चु.

वाहत राहतात अश्रु
कोरडे पडले डोळे.
भरल्या आभाळाचे दुख
येथे कुणाला न कळे..
©गणेश भोसले

आठवण विरत आहे
उजाळा किती वेळा देऊ
रोजच लिहतो तुला मग
सांग कोणते पुरावे देऊ
©धनराज भुमरे

पुरावा नको काही ,
आहे पुर्ण विश्वास.
तुझ्यातच वाहत राहीन,
आहे जोवर श्वासात श्वास.
शब्द्-अर्चु.

असाच राहो विश्वास
टिकुन ठेवा नाती
कळावी या जना
जगण्याची महती.
©गणेश भोसले

भरल्या आभाळाचे दुःख
धरतीला छान कळते
पुन्हा भेटायच्या ओढीने
नव्याने पुन्हा बहरते
©धनराज भुमरे

भरल्या डोळ्यानी,
तुला मी पाहीन.
दाटल्या भावनासोबत,
तुझ्यात वाहीन.
शब्द्-अर्चु.

वाहने थांबणार नाही
काळजात सागर साचलेला
आठवतो शब्द आजही
तुझ्या डोळ्यात वाचलेला
©धनराज भुमरे

नव्याने होईल ,
भेट आपली.
शमेल तहान,
जरी धरती तापली.
शब्द्-अर्चु.

वाचलेल्या भावनांना,
हृद्यात साठवुन आहेस.
कधीतरी मुक्त हो,
अजुन किती झुरनार आहेस.
शब्द्-अर्चु.

बहरण्याचा हा खेळ
माझ्या फुलवतो मना.
ऊन पावसाचा मेळ
संदेश मिळतो या जना.
©गणेश भोसले

नको लागुन देऊ,
भनक तु जनास.
फरक नाही पडत इथे,
कोण ,कुठला कोणास.
शब्द्-अर्चु.

भेटीसाठी आतुर जरी
साजन मात्र रुसला आहे
वाट दाखवणारा रानावरचा
नकाशा तो पुसला आहे
©धनराज भुमरे

पुसला जरी नकाशा तु,
वाट मी शोधनार आहे.
कानोसा तुझा हृद्यात माझ्या,
सांग मला कोण अडवनार आहे.
शब्द्-अर्चु.

ऊन पावसाचा खेळ
बघतात येथे सर्व
कोसळले व्यासपीठ 
घाबरलेले आहे पर्व
©धनराज भुमरे

बहरण्याचे क्षण हे
फुलणारे मन सुगंधी  
तमा न कसली जीवाला
चढली श्वासास धुंदी
©धनराज भुमरे

ऊन ,पाऊस ,वादळ,
कोण मज न आडवी,
असेल धमक तर,
शक्कल आजमावी.
शब्द्-अर्चु.

बहरण्याचे क्षण ,
बहरतच राहनार.
प्रेम आहे तुझ्यावर ,
करतच राहनार.
शब्द्-अर्चु.

नकाशा पुसणारा मी नाही 
तू नव्याने बहरून येशील का
हीच वाट माझी जाणून घे
पुन्हा पुन्हा सामावून घेशील का
©धनराज भुमरे

मन वेडे आहे रे
सावरते कधी बावरते.
धावते कुठेही बेभान
कोन याला आवरते..
©गणेश भोसले

सामावुन घे तु कधी
काय मिळते प्रेम गमावुन
जगण्याचे खरे हित
काय आहे दुसरे याहुन.
©गणेश भोसले

आवरणारे एक मन असते
बावरणारे एक मन असते
धावणारे सगळे येथे जरी
भावणारे एक मन असते
©धनराज भुमरे

कुठे असते हे मन
बाहेर कि आत.
आजवर कुणी त्यावर
केली नाही मात.
©गणेश भोसले

काव्याच्या खेळात अशी
तु लपत नको जाऊ
शब्द धन मिळते इथे खुप
आपण सारे ते लुटून घेऊ.
©गणेश भोसले

मनास मारताना
मी , तिला पाहिले
मनाचे अश्रू ते
मनातच राहिले
©धनराज भूमरे

शब्द धन लुटलेले
सताड उघडेच ठेवू
घेतील सर्व आनंद
अश्या ठिकाणी नेऊ
©धनराज भुमरे

मन मारुन जगायला ,
मी आता शिकले आहे.
नको परत ती आस आता.
खरंच मी थकले आहे.
शब्द्-अर्चु

दुनिया बाजार आहे,
नको तेच घेते.
विनाकारन मंग ,
अपनासच दोष देते.
शब्द्-अर्चु.

हेच तर आहे
विश्वातले खरेखुरे दान.
वाचाव सर्वानी
द्याव हृद्यात स्थान.
©गणेश भोसले

आस मनी असतेच
मन ही बोलत असते
चालण्यास पुन्हा, क्षणभर
विसावा शोधत असते
©धनराज भुमरे

धन्यवाद...😊🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा