सोलले तोंड अन लालबुंद झाले
झोंबणार नाही असे खाऊ काय
पांढरी पांढरी ते फोडं सलणारे
वळवणाऱ्या जिभेला लागले पाय
फिरतच राही ती आतल्या आत
असेच मनाचे बहुदा होत असावे
गुटमळत राहते एकाच विषयात
काहीतरी त्यालाही सलत असावे
©धनराज भुमरे
१९/०९/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा