पोरी तुझा प्रेमी रोपटे
सरी झेलून त्यास पाहू दे
अन मुळाशी प्रेमाचा झरा
सदैव तुझा वाहत राहू दे
पोरी तुझा प्रेमी लाजरा
तुझ्या हाती त्याचा कासरा
सतावू नकोस कधी त्या
अल्लड बिचाऱ्या वासरा
पोरी तुझा प्रेमी हळवा
बांधलाय नात्यात घट्ट
मिळावा तोच मजला
असा नकोस करू हट्ट
पोरी तुझा प्रेमी भित्रा
जपतो दोघांच्या नावाला
समजतंय प्रेम तुझं पण
काय सांगेल तो गावाला
©धनराज भुमरे पाटील
२४/१२/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा