सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

बाप माझा छत्रपती

बाप माझा छत्रपती
मातीसाठी तो झुंजला
राजा शिव छत्रपती
नाद सह्याद्री गुंजला

मनगट जोर धरी
नाम घेता तुझे देवा
विचारांचा अनमोल
दिला आम्हा असा ठेवा

भाव भक्तीचा सागर
हाती तेज तलवार
शौर्यवंत महाराजा
किर्ती रे अपरंपार

चंद्रा सुर्यासम देवा
तेज तुझं बहुमान
पाने फुले आसमंत
पक्षी गाती गुणगान

©धनराज भुमरे पाटील
१६/१२/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा