*फेसबुक वरील काही अनुभव*
__________________________________________
फेसबुक हे सर्वात लोकप्रिय social media ,
त्यापासून मी कसा दूर राहणार ?
फेसबुक वापरायचे फायदे खूप आहे ,
आणि त्याच बरोबर तोटे ही आहे .
काहीतरी आयुष्याचा निर्णय घेतात ,
इथपर्यंत वापर करणे योग्य आहे का ?
हे एक व्यसन म्हणून सुद्धा चर्चेत आहे
सर्वाना माहिती असेलच ?
मी जेव्हा फेसबुक वापरास सुरवात केली तेव्हा खूप अनोळखी मित्र भेटले , आपल्याच विचारासारखे असणारे आवडी निवडी जवळ जवळ सारख्याच ,
रोज बोलणे होत असायचे अगदी जवळची मैत्री झाली जशी .
हळू हळू मलाही फेसबुकचे वेड लागले ,
अगदी 5 मिनिट हि वेळ भेटला की मी त्यात गुंग होऊन जायचो .
कित्येक वेळी धोका देणार असतात मुद्दाम जाळ्यात अडकवतात , मी नवीन असल्याने एक ग्रुप ने मला प्रेमाने जवळ केले आणि एक मुलीच्या प्रेमात पडायला नकळत प्रोसाहन दिले अन मी त्या जाळ्यात अडकलो ,काही दिवसाने त्या मुलीने पैशाची मागणी केली.
मी आपला विचार करत राहिलो पण शेवटी तिच्या टाकलेल्या जाळ्यात अडकलोच ना ,
असो ती रुपये घेऊन गेली पण मित्र खूप गमावले .
पैशाला कधीच किंमत नसते किंमत असते ती मित्रांचीच चांगल्या विचारांची किंमत अनमोल खजिना असतो तो तुमचा .
आता मात्र मी एकटाच आहे समजून आले ना की जे झाले ते खूप लवकर होऊन गेले ,
प्रेम कधीही होते एकदाच होते असेही नाही ,
पण पहिले प्रेम मात्र कुणी विसरू शकत नाही .
मी दूर झालो हे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी योग्य होते , आता पुन्हा नव्याने सुरवात करायची
अवघड आहे पण तो भूतकाळ होता ,
वर्तमान हा समजदार आहे पुढच्या भविष्यासाठी .
चांगले विचार म्हणजे न संपणार खजिना लुटत राहा आणि आपलाही खजिना वाढत जाईल ,
ज्ञान वाटत राहा ,
या पासून दूर राहायचे ठरवले तर मी माझे फेसबुक पेज तयार केले व त्या वर काम करत राहिलो कित्तेक मित्र भेटले मला पेज वर काम करण्यासाठी आणि त्यांनी चांगले काम केले विचार शेअर करून पण हॅकिंग मुळे ते पेज बंद पडावे लागेल,
माझा id हॅक होतोय अस समजताच मी पेज बंद करून id ची काjळी घेण्यासाठी काही दिवस फेसबुक ला राम राम केला ,
Wapka . Com वर नकली फेसबुक पेज तयार केले जायचे व तिथे युजर नेम व पासवर्ड टाकताच ती माहिती त्यांच्याकडे जायची नकली असल्याने ते पेज ओपन न होता पुन्हा त्याजागी यायचे ,
काळजी घ्यावी नेहमी फेसबुक वापरताने अशा अनेक साईट आहेत जे हॅकिंग करतात ,
फेसबुक ने यावर नियंत्रण ठेवले आहे तरी आपणही खबरदारी घ्यावी .
कुणाला बदनाम करण्यासाठी का इतर काही कारणासाठी फेक/नकली अकॉउंट कडून त्रास देण्याचेही प्रमाण खुप आहे अशा अकॉउंट ला आपल्या लिस्ट मध्ये भरती करायचंच नाही ,
कधीही अंगलट येऊ शकते ,
नकली अकॉउंट फार काळ नाही टिकणार पण कमी वेळेमध्ये ते त्यांचे काम करून घेतात ते बंद पडले कि पुन्हा दुसरा तयार ,
काळजी ही आपण घ्यायला हवी .
आता फेसबुक वरही वाद होत असतात काही वाद तर
खूपच त्रास दायक असतात हे फक्त फेक अकॉउंट मुळेच होते अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.
खास करून मुलींना जास्त टार्गेट केलेले असते .
ओळख नसताने संदेश पाठवतात हे चुकीचे नाही ,
पण विनाकारण सन्देश पाठवतात ,
मुलींना त्रास देतात त्यांना नाही वेळ कुणाशी बोलायला ,
मग का सतावतात msg बघून रिप्लाय देत नाही वगैरे वगैरे बोलतात , एकदा नाही म्हणून सांगितले तर
वारंवार संदेश पाठवून त्रास का देतात ?
या बाबत मुलींना खूप त्रास होतो
त्यांच्या तक्रारी खूप आहेत कारण त्रास देणारा एक नसतो असे अनेकजण असतात त्यांनी काळजी घ्यावी ब्लॉक पर्याय असतो कुणी त्रास दिला कि सरळ ब्लॉक करून मोकळं होयचं .
तर मुलींना/महिला यांना विनंती आहे की ज्यांच्याशी ओळख असेल असेच मित्र लिस्ट मध्ये असू द्या ,
नवीन कुणी असेल तर पूर्ण माहिती तपासूनच निर्णय घ्यावा ,
2 वर्षापूर्वी मुलींचे स्वतः फोटो अपलोड करण्याचे प्रमाण फारच कमी होते ,
आज बघा किती प्रमाण आहे फोटो अपलोड ?
मला याबद्दल काही अडचण नाही पण
फोटो अपलोड/शेअर करताने खास काळजी घेतली पाहिजे ,
फेसबुक वर शिकण्यासाठी भरपूर आहे ,
फेसबुक चा चांगला काळजी पूर्वक वापर केला पाहिजे
बाकी गमतीदार गोष्टी खूप आहेत फेसबुक वर मन शोक्त पणे आनंद घ्यावा कुणी जोक्स शेअर करतात तर कुणी स्वःत जोक बनतात , असा
अनुभव बहुदा सर्वानाच आला असेलच ,
_______________________________________
फेसबुक वर माझी छोटीसी कविता
*आभासी दुनिया*
असतात अनोळखी मित्रमैत्रिणी वाटतात ओळखीची
फेसबुक अनोखी आभासी दुनिया भारी मनोरंजनाची
.
आभासी असलेतरी ती आपल्याशी जोडलेली आहे, वास्तव नसेल पण वास्तवातूनच निर्माण झाली आहे .
मनमोकळे होते इथे मन माझे वेडेपिसे होते कधी , शोधातो कुणाला अन मला हि शोधावे कुणी कधी .
येण्या-जाण्याची वेळ नाही ठरलेली कुणाची ,
तरी वाट पाहतच राहतात इथे परत येण्याची .
_________________________________________
२७/११/२०१६
*©धनराज भुमरे पाटील*
*मु.पो. पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .*
*मो:- 7218613434*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा