सायंकाळी उधळीत जाई नभात रंग ,
विरघळतो जसा पाण्यात उठे तरंग .
सायंकाळी सुटे पक्षांची हि शाळा ,
मनमोहक क्षण सर्वांनाच लावी लळा .
सायंकाळी शांत तांबड्या रंगाची शोभा ,
किलबिलाट फार पक्षाचा खेळ चाले नभा .
झुळझुळ पाणी शांत नदी हा किनारा ,
रंगात रंग भरे पक्षी घेऊनि चिमनचारा .
चमकती रवी किरणे, सोनेरी पानांचा थाट ,
लगभग चाले वेळ , धरावी घरची एकच वाट .
थांबावे कुणी वेळ कि भरभर चालावे किती ,
मनाला लागलेली हुरहुर वेगळीच हि भीती .
कुणाला छान कुणाला वाटे भयानक ,
असा का येतो हा अंधार अचानक .
सायंकाळी बघुनी त्या पाखरांचे थवे
मन उडे फार वाटे कुणी सोबती हवे ,
________________________________
©कवी :- धनराज भुमरे पाटील ,
पाचोड, ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा