..............माझी मायभूमी..............
_______________________________
जन्मलो इथल्याच पवित्र पावन मातीत,
रांगलो इथल्याच सर्वगुण संपन्न मातीत .
नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी मायभूमी .
माझ्या मायभूमीत थोर किती जन्मले ,
समाजासाठीच पूर्ण आयुष्य वाहिले .
मातीत जिरलेलं रक्त खळखळतं नदीत ,
शुरांना वीरमरण लाभले या मायभूमीत .
कष्टी बळीराजा इथल्या काळ्या मातीत राबतो ,
आभाळाची माया जेव्हा पाऊस होऊन बरसतो .
दुष्काळाची होती शिक्षा चटके बसण्यासाठी ,
नका तोडू निसर्गाचे नियम या मायभूमीसाठी .
माय लेकरांची किती अतूट गोड़ गुंफण ,
चांगल्या विचारांचे आपण घालूया कुंपण .
बलात्कारी, भ्रष्टाचाराचा कचरा हटवण्यासाठी ,
मजबूत होऊन लढूया या मायभूमीसाठी .
नाही भासली कधी आईची कमी ,
अशी प्रेमळ हि माझी मायभूमी .....
___________________________________
२१/११/२०१६
©कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद
मो :- 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा