___________________________________
झुळकासारखी हळुवार अलगद येऊन गेली
नको काही पुरावा तुटलेली पाने घेऊन गेली
सळसळ करत वेलीतून मंद शीळ घालीत
गुंतलेल्या मनासोबत डाव खेळून गेली
तुटलेले मन खुलून थोडे पुन्हा शहारले
त्याच मनावर आरोप खोटे ठेवून गेली
सोबतच घालवली वेळ दिली होती साथ
राख होईल सर्व अशी आग पेटून गेली
पहिले नकोसे होते ते प्रेम पुन्हा झाले
पुन्हा ती तार काळजाची छेडून गेली
_______________________________
१८ जानेवारी २०१७
©धनराज भुमरे पाटील
मु.पो. पाचोड, ता. पैठण ,
जि. औरंगाबाद .
मो:-7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा