माझ्यात रमतो विरह....
_______________________________
आठवणीच्या सागरात जाळतो विरह
प्रेमाने दिलेत घाव हृदयात माळतो विरह
होते दुःख मनाला प्रेम दूर कुठे जाताना
या एकटेपणात प्रत्येकाला छळतो विरह
सीमेवर लढणार मातेचा शूर सैनिक हा
सुखपासून दूर रक्षणासाठी भोगतो विरह
आस पावसाची तव तप्त धरनी दुष्काळी
शेतकरी आत्महत्येचे कारण बनतो विरह
स्वबल होण्यास धरला ध्यास शिक्षणाचा
वंचित त्यांना कसा बाहेर उडवतो विरह
बघून घराचे स्वप्न जाण्यास निघे शहरी
अन फाडक्याच गोधडीत लोळतो विरह
दिव्यंग असे तरी धावतो , दिसे ना काही
शोधीत वाट अंधारात वेगळा रंगतो विरह
निस्वार्थ प्रेम राधेचे यशोदेच्या कृष्णावर
बासरीच्या सुराने हा एकटा पडतो विरह
शोभून दिसे धनु आकाशी उधळीत सप्तरंग
प्रिय घाव झाला तो माझ्यात रमतो विरह
__________________________________
२९/जानेवारी/२०१७
©धनराज भुमरे पाटील (पाचोड)
7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा