शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

जीव गेला जळून

जीव गेला  जळुन
___________________

सांग कळेल का कधी
तुझ्या मनात जसा
तुला फक्त एक बाजू
दिसलो तुला मी कसा

हरलो , विरलो प्रेमात
झाले का ते पुन्हा
भावना उसळल्या
एवढाच माझा गुन्हा

झाडाचे सुकलेले पान
पडले अलगद गळून
झुळूक आली अशी
जीव गेला जळून

माफ करशील का एकदा
चूक एका वेड्या मनाची
मिळेल का साथ रानाला
दूर असलेल्या त्या नभाची
________________________
©धनराज भुमरे पाटील (धनु)
7218613434
मु.पो. पाचोड ,
ता. पैठण ,
जि. औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा