बुधवार, २५ जानेवारी, २०१७

पाहिजे....

पाहिजे
______________________________
मनी एकात्मीयता वाढायला पाहिजे
संकटकाळी सर्वांनी धावायला पाहिजे

होतात गरिबांवर खूप अन्याय  रोज 
भ्रष्टाचाराचा पुतळा पाडायला पाहिजे

स्वतः दुष्काळ मानवा ओढवून घेतला
जगण्यासाठी झाडे लावायला पाहिजे

अनाथ झाली माय , लेकरे घरामध्ये
मोहमायेचा पडदा फाडायला पाहिजे

जाती धर्माचे भांडणे सोडून आता 
भारतीय होऊन वागायला पाहिजे

आदर्श बालके घडवण्यास आईने  
वाघिणीचे दूध पाजायला पाहिजे

रक्षणासाठी आले वीरमरण सीमेवर
पुत्राची देशभक्ती आठवायला पाहिजे 
_______________________________
©धनराज भुमरे पाटील  (पाचोड)
३१/जानेवारी/२०१७
7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा