तो आणि ती .....
College life .
_____________________________
*अवखळ अशी कॉलेजात एक परी
त्याच्यासाठी ती खूप खास आहे
कट्यावर बसून तिचाच विचार
भेटणार एकदा हीच आस आहे
*नजरेत भरली असे वेडावून
रोज वाट बघत एकटाच बसे
भान ना राहिले त्यास कसले
बघताच कुणी तव गालात हसे
*जिवंत प्रेमाचा झरा खळखळणारा
त्याच्या मनात नित्य वाहू लागला
ती हसून त्याच्याकडे बघताना तो
गोळक्यात ही चोरून पाहू लागला
*तळमळ जीवाची सर्वाना कळली
प्रेमकहाणीची सुरवात कशी झाली
चर्चा रोज तिची अन त्याची सुरु
हळुवार स्वप्नात सुंदरी अशी आली
*सुमन फुले बहरली हिरवळ मनी
अबोल प्रीत ही हळूच बोलून गेली
भाव चेहऱ्यावर लपवताना हसू
नजरेची गुंतागुंत सहज खोलून गेली
*जादु अशी झाली समोर बघताच
पहिल्याच नजरेत गुलाब फुलला
काय म्हणावं या प्रेमाला कळेना
बहरून मनी ऋतू वसंत खुलला
*तारकात वेगळाच दिसे नक्षत्र
चंद्र चांदणीच्या प्रीतीत दंगला
भावना ओळखून तव कवी
म्हणे जीव तुझ्यात रंगला
_____________________________
२९-१-२०१७
©कवी:-धनराज भुमरे पाटील
BCA TY
Mo:-7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा