सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

...........प्रेमाच्या गावातील कल्पवृक्ष


मनाच्या ढगातून गोड़ , शब्दांचा पाऊस  बरसेल ,
हृदयाच्या रानात चहूकडे , कवितांची हिरवळ बहरेल .

कवी एक रोप कौतुकाच्या वाऱ्याने खळखळ हसेल , गालातले ते सळसळत्या पानात स्वच्छ हसू दिसेल .

वास्तवात  हि कल्पनेची मनाची अशी सुंदर दुनिया ,
तुटलेले  मनाच्या जखमा भरे रसाळ फळाची किमया .

झाड होऊन तेही देतील रसाळ फळे खूप गोड़ असेल
प्रेमाच्या गावातले  ते कल्पवृक्ष  सर्वांसाठीच असेल .

_______________________________

१७/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा