शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

चिमुक काटे

.................चिमुक काटे .........

आठवेल का कधी त्या तान्ह्या पायात टोचलेले ,
जपले किती आईने लेकराला कडेवर ऊचलेले .
जाणवेल का कधी आईच्या पायाला चटके बसलेले ,
सोडून गेली मायेला , बायकोला  चिटकून बसलेले .
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ....

आगळे वेगळे जरी हिरवळीत  प्रेमाने खुलले ,
वाळले झाड प्राण सुटता तरी बिलगुल बसले   .
जमिनीवर जसे छोटेसे चांदणे अवतरले .
सुकणार एक वेळ असे हे फुल बहरले
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ...

पुन्हा एक फुल  उमलून हसणार ,
रूप तुझेच तुला आता  दिसणार ,
चक्र हे ठरलेलं दिलं तेच भेटणार ,
म्हणशील जेव्हा तुलाही  समजणार ,
ते
फुल होते नाजूक छोटे ,
तुटले झाले चिमुक काटे ....
___________________________
१९/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा