सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

मला स्वछंदी कवी बनायचे आहे .....

मला स्वछंदी कवी बनायचे आहे......

निसर्गाकडून मला खूप खूप शिकायचे  आहे ,
शब्दांची बीजे घेवून सुगंधी फुल फुलवायचे आहे ,
सुंगधी मोकळ्या वातावरणात मला खेळायचे आहे ,
शर्यतीत धावताना पडलो तरी उठून पळायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ......

मनापासून मला कवितेचे रोप लावायचे आहे
शब्दांची शेतीस मनापासून जपायचे आहे ,
टोचतील खूप काटे-कुटे सहन करायचे आहे ,
लपवून सारे दुःख सुगंध पसरावयाचे आहे ,.
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

कौतुकाच्या पावसात मला पण भिजायचे आहे ,
फुलणारे एक एक नाजूक रोप जगवायचे आहे ,
पहाटे पडणार्या धुक्यात मला हरवायचे आहे ,
पानावरचे अनमोल ते मोती  शोधायचे आहे .
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

गावाकडे मला  मुक्त मोकळे बागडायचे आहे ,
प्रसन्न  फुलांना घेऊन शहरास हरवायचे आहे ,
सुगधं घेऊन फुलांचा रसाळ फळ चाखायचे आहे ,
चोरून आणताना फसगत ते क्षण आठवायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ......

निसर्गाकडून  मला अजून खूप काही शिकायचे आहे ,
कणखरपणा अंगी तरीही गोडवा टिकवायचा आहे ,
ऊन वाऱ्यासारखे संकट मला झेलायचे आहे ,
वादळा नंतरही मला तग धरून राहायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे ……

फुलपाखरू होऊन मला थोडेसे जगायचे आहे ,
फुलांचा सुंगंध अन पंखात रंग भरायचे आहे ,
नाजूक सुगंधी फुल रंगीत बनायचे आहे ,
फुलपाखराच्या पंखात रंग भरायचे  आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे......

नाजूक वेल होऊन मैत्रीचे झाड जपायचे आहे ,
वेल होऊन मला मित्रांना बिलगून राहायचे आहे ,
नभात मन पाखरू होऊन  भिरभिरायचे आहे ,
सुंदर झाडावर प्रेमाचे एक घरटे बांधायचे आहे .
मला स्वछंदी कवी  बनायचे आहे ......

जगताना स्वप्नपरीच्या प्रेमात पडायचे आहे ,
गैरसमजाचे ते गणित मला सोडायचे आहे ,
दुरावा तो येणारच सहन करायचे आहे ,
बाष्प होऊन पुन्हा थेंबाने परतायचे आहे .
मला स्वच्छंदी कवी बनायचे आहे ......

सीमेवर लढणारा शूर सैनिक बनायचे आहे ,
भारत मातेच्या रक्षणास मजबूत बनायचे आहे ,
अन्यायाच्या  विरुद्ध जोशात लढायचे आहे ,
एकीच्या बंधनाचा अतूट धागा बनायचे आहे .
मला स्वछंदी कवी बनायचे आहे.....

इमानदारीने माणुसकीचे गुण अंगी बाळगायचे आहे ,
आई-बाबाचा लाडकं लेकरू लहानच राहायचे आहे ,
शेतात कष्ट करून रात्री शांत पणे झोपायचे आहे ,
इथल्या काळ्या मातीत मला शेवटी मरायचे आहे.....
मला स्वच्छंदी कवी  बनायचे आहे ....

मला स्वच्छंदी  कवी  बनायचे आहे ....
....................................................

१७/११/२०१६
©कवी :- धनराज भास्करराव भुमरे पाटील .
पाचोड ,ता .पैठण  जि. औरंगाबाद .
मो : 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा