प्रेमाच्या वाटेवर मी खूप पुढे आलो ,
तू तू करताना तुझ्यातच हरवलो .
घेऊन स्वप्न तुझे रंगवलित चित्र ,
विचार तुझा करताना सरते रात्र ...
प्रेमाची पहाट मनासारखी कधी झालीच नाही ,
एकट्या प्रेमाच्या वाटेवर तुलाच शोधात राही .
तू आहे तशी तिथंच राहिली ,
मी मात्र प्रेमाची फुले वाहिली .
नाही समजणार मन तुझे मला ,
कारण आहे तुझा तोच अबोला .
नाही राहिले आता बाकी काही ,
तू एकही शब्द बोलली नाही …
समोरच होतो
तुला कधी मी दिसलोच नाही .....
तुला कधी मी दिसलोच नाही....
_________________धनु
१७/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा