सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

ब्रेकअप

...............ब्रेकअप...................

प्रेम सर्वांना होते तसे , मलाही ते  झालेच ,
वेगळे झाल्यावर , नकळत  अश्रू  आलेच .

अश्या  वेळी खूप त्रास, होतो जवळ असल्याचा ,
अनपेक्षित घडले मात्र , मनाला धक्का बसल्याचा .

येते आठवण   सोबतीची , मनामध्ये रोज ,
घाव होतो अन अदृश्य ,  हृदयावर  सूज  .

कारण हवे नसते ठोस वेगळे  होण्यास
मनाविरुद्ध पण रोखत नाही एकमेकास .

रोजच रडतात तो आणि ती , मनातल्या  मनात ,
हरवून जातात दोघेही  प्रेमाने , लिहलेल्या पानात .

आव आणतात विसरलं , झाले गेले  सर्व  ,
येतो पुन्हा  जगण्याचा , एक  नवा   पर्व .

का  समजून घ्यायचे नसते एकमेकांना ,
जे झाले  बसत नाहीच विश्वास दोघांना .

माझ्याच मनाला मी समजतो का असा ,
प्रेमात खूप मी आता शिकलो जसा .

नसेल माझे खरे , आहे फक्त भावना  वेड्या मनाची ,
प्रत्येकाला वेगवेगळी , कळली नसती  प्रीत प्रेमाची .

...............अबोल भावना.........धनु.
१४/११/२०१६
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा