गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

मनात माझ्या शब्द घोळू लागले ....

शब्दच झाले आता आपले ,
जसे कि तुला मनात जपले .

भावना माझ्या समजून घे ,
चोरी झाली मनाची उमजून घे .

नाही तुझ्यासारखे कुणीच ,
कवी झालो हा भास का उगीच.

शब्द आहे माझ्या मनातले ,
जगात कुठे तरी हेच ऐकलेले .

हक्क नाही माझा या शब्दावर ,
मोकळ्या भावना मात्र तुझ्यावर .

तुझ्यामुळे  कवी कवी  मला ही म्हणायला लागले !
सांग यामध्ये कविसारखे काय दिसायला लागले ?.

मनात माझ्या शब्द घोळू लागले ,
तुझ्या आठवणीत खेळू लागले ....

_____________________ धनु ...

कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा