.....................मन ...................
मन असते खूप नाजूक कधीही तुटेल ,
त्रास कठोर सोसता नयनी अश्रू आटेल ,
तरीही का कुणाचे मन अश्रुनेच दाटेल ,
सांग रे या दगडाला पाझर कसा फुटेल .
मनाचा असतो भ्रम सांगतो खरे काही ,
मोकळे करूनही एक मन त्यास पाही .
मन मोकळे वाऱ्यासारखे ते स्वच्छंदी ,
मुक्त बेबंध तरी मन मनाचाच तो कैदी .
मन घे थोडे समजून तूहीं तुझे दे मला ,
मनापासून शिकावी हि मनाची कला .
नको रे असा हा गुंतवू मायाजाल ,
तुटलेले मन बघून होतात खूप हाल .
मनाची बात न्यारी चहूकडे बागडे ,
शोधावे कितीही कुणाला ना सापडे .
मन नेहमी गुंतलेले आपल्याच नादात ,
हरवलेले मन तरी हळूच बोले कानात .
मनापासून मनाचा मानपर्यत प्रवास ,
दिसतो ना दिसतो मनाचा आभास ,
शब्दाच्या या बागेत सुगंध दरवळे ,
खेळ खेळे फुलपाखरू मन मोकळे .
..................अबोल भावना.......................
१३/११/२०१६
___धनु...
कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड
मो :- 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा