गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

कवी

____________________________________

वास्तवातून काव्य जन्माला घालणारा  कवी
कल्पवृक्षाचे रसाळगोड फळ  वाटणारा कवी

बालकाच्या शब्दात काव्य रचणारा  कवी
शब्द संगतीत निसर्गात रमणारा  कवी

अन्यायाला वाचा फोडवणारा  कवी
मनामना मध्ये डोकावणारा  कवी

कुठलाही वाद प्रेमाने संपवणारा कवी
ध्येयवेडे स्वप्नांना रंगवणारा कवी

विचारांचे  वादळ शब्दबद्ध करणारा  कवी
धारदार बनवून शब्दशस्र  धरणारा  कवी

प्रवास संपला तरी अथक चालवणारा कवी
अंधारातही सूर्य प्रकाश दाखवणारा कवी

_________________________________
२९/११/२०१६
©धनराज भुमरे पाटील ,
पाचोड, ता.पैठण ,जि. औरंगाबाद .
मो:- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा