...................जीवन................
जगणे आहे का झोक्या सारखे कळू दे ,
सुख अन दुःख झुलतात त्यांना झुलू दे .
जगणे आहे का झोक्या सारखे कळू दे ,
सुख अन दुःख झुलतात त्यांना झुलू दे .
दुःख लपलेले करते पाठलाग , मनात भीती ,
या जीवाला त्रास घाव मोजले का किती .
सुख हसरे गालात खुलते जणू एक झोका ,
दुःख मागे सारून झुलते दिलेला प्रेमळ धोका .
प्रेम झुळूक होऊन क्षण येतो असा,
दुःख विसरून जातो मनी लुप्त ठसा .
जीवनातला खेळ हा आपलाच , आनंदाने खेळायचा ,
सुख-दुःखाचा झुला आपलाच , झुलवत ठेवायचा .
...............................धनु.
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पत्ता :- पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो :- 7218613434
मो :- 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा